मुंबई : आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार, संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी पवारांवर निशाणा साधला होता.
आशिष शेलारांनी शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांवर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुराव्यासकट उत्तर दिले आहे. जेव्हा शरद पवार फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?, असा सवाल राष्ट्रवादीने आशिष शेलारांना केला आहे.
जेव्हा आदरणीय शरद पवारसाहेब काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा @ShelarAshish तुम्ही झोपले होते का?
गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा. https://t.co/MZHtVrRPGk pic.twitter.com/S5eRyQ4mYR— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) January 27, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पवारांवरील टीकेला उत्तर दिले. जेव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का? गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा, असे ट्विट करत क्रास्टो यांनी शेलारांना उत्तर दिले.
दरम्यान, टीव्हीवर येण्यासाठी पवारांचं नाव घेतलं जातं, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शेलारांवर निशाणा साधला आहे.
Read Also :
- अमित शहांचा राजीनामा घ्या, दिल्लीतील हिंसाचारानंतर काँग्रेसची मागणी
- ‘बेळगाव सोडा, मुंबईवर सुद्धा आमचाच हक्क’, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचे अजब वक्तव्य
- ‘देवेंद्रभाऊ, ज्या मेट्रोतून तुम्ही प्रवास केला त्याची सुरुवात काँग्रेसने केली’, सत्यजित तांबेंचा फडणवीसांना टोला
- ‘ती’ 2 नावे घेताना काहींना अॅलर्जी होते, शरद पवारांचा विखे पाटलांवर निशाणा
- ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप