नांदेड : महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून कार्यकर्ते आघाडीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याअगोदर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बॅनर्स मुंबईत झळकले होते. त्यानंतर काल नागपुरात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचंही नागपुरात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले होते. अशातच आता नांदेडमध्येही काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुलीचं भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे राज्यात आघाडीच्या कार्यकर्त्यांना भावी मुख्यमंत्र्याचं डोहाळे लागले आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी..! “सगळ्यांचा फोन आला, पण अजितदादांचा फोन आला नाही,” जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया हिच्या वाढदिवसानिमित्ताने भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. यातच आता चव्हाण कुटुंबीयांची तिसरी पिढी राजकारणात येण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या बॅनर्सवर अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलीचा फोटो झळकत आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री म्हणून श्रीजया हिचा उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा…भाजपविरूद्ध आघाडीने रणशिंग फुंकलं..! ‘१६ जून’ आघाडीचा मोर्चा महापालिकेवर धडकणार
याआधी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले होते. याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांचेही काही बॅनर्स लागले होते.
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटक निवडणुकीसारखा राज्यातील जनता निकाल देण्याच्या भीतीने ‘राष्ट्रवादी’ भाजपच्या टार्गेटवर”
हेही वाचा…“याद्या तयार, चेहऱ्यावर हसू, लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसची बैठक, मोठी भरारी घेण्याच्या तयारीत
हेही वाचा…बहुमत असतांनाही आघाडीत बंडखोरी, राष्ट्रवादीचा सभापती, भाजपला दणका, परभणीच्या निवडणुकीची चर्चा
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा फोन आला, पण अजित दादांचा नाही, जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, मी माझ्या…
हेही वाचा…“घोडामैदान जवळ आहे, मंत्री झालो नाही तर…” बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?