मुंबई : आयएल आणि एफएस या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांची इडीकडून ९ तास चौकशी झाली. जयंत पाटलांवर इडीने कारवाई केल्याने काल संपुर्ण राज्यात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत ईडी आणि भाजपच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं. यातच काल महाविकास आघाडीतील सर्व नेत्याचं फोन आलं परंतु अजित पवारांचा फोन आला नाही. असं जयंत पाटलांनी म्हटल्यानंतर राष्ट्रवादीत गटबाजी असल्याचं दिसून आलं.
हेही वाचा…भाजपविरूद्ध आघाडीने रणशिंग फुंकलं..! ‘१६ जून’ आघाडीचा मोर्चा महापालिकेवर धडकणार
राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात काही प्रमुख नेत्यांची कामं असतात, ते त्यात गुंतलेले असतात. ते काम सोडून मुंबईत यावं, अन् सगळ्यांना माहिती आहे की जयंत पाटील स्वच्छ आहे. चौकशी झाल्यानंतर ते बाहेर येणार असल्याची खात्री असल्यामुळे अन् त्यांचा माझ्यावर विश्वास असल्याने ते आज उपस्थित राहले नाहीत. अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या गैरहजरीवर दिली आहे. यातच महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचा फोन आला पण अजित पवारांचा फोन आला नाही. असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“ते फोटो बीडचे नाही तर शिंदेंच्या वरळीतील सभेचे,” ठाकरे गटाने फोटो पाठवत भाजप अन् शिंदे गटाचं पितळ उघड पाडलं
दरम्यान, जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील साहेबांना आलेल्या ईडी नोटीसीचा कर्नाटक निकालाशी संबंध असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विनाकारण त्रास देऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा होत असलेला प्रयत्न हा सरकारला कदापि शोभणारा नाही. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…‘भावी पंतप्रधान’ म्हणून सातत्याने डिवचलं, शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले, “पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी..”
हेही वाचा…जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी, राष्ट्रवादीचं आंदोलन, फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“..तर संजय राऊत अंडासेलमध्ये असते..” शिंदे गटाच्या आमदारानी व्यक्त केली शक्यता
हेही वाचा…आघाडीत आता भाऊ बंदकी…! कोण मोठा भाऊ, कोण लहान भाऊ, ? जागावाटपावरून संघर्ष सुरू ?
हेही वाचा…” आघाडीत आता राष्ट्रवादीचं मोठा भाऊ,..” अजित पवार अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये रंगला कलगीतूरा