बीड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेची सांगता बीड येथे झाली. या सभेला खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या. या सभेला लोकांचा अल्प प्रतिसाद म्हणत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी सेनेला डिवचलं. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी सभेचं फोटो ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“आता ‘टिल्लूपासून उल्लु’पर्यंत आता सर्वांची वरात निघेल”, जयंत पाटलांच्या इडी कारवाईवरून राष्ट्रवादीने दिला भाजपला इशारा
बीड जिल्ह्यात महाप्रबोधन सभा पार पडली. याआधी ही सभा विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत आली होती. यातच शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी या सभेचे फोटो करत निशाणा साधला. कृपया माझी विनंती आहे. ही सभा महाप्रबोधन सभा आहे की नाही आपणच ठरवावे. झूम करून पाहावे असा शाब्दिक टोला सामंतानी लगावला.
हेही वाचा…“जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचं ‘तुफान’ मुंबईत धडकलं..! ‘मोदी चोर है’च्या घोषणा
तर शकूनीमामाचा बीड मध्ये प्लो शो. असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांना डिवचलं. त्यावर प्रिय उदय सामंत भाऊ, प्रिय नितेश राणे महाप्रबोधयात्रेची आपली काळजी नाहक आहे. रिकाम्या खुर्च्यांचे पोस्ट केलेले फोटो शिंदे साहेबांच्या वरळी सभेेचे आहेत. महाप्रबोधन यात्रेचे ओरिजनल फोटो पाठवत आहे. आणि हो चष्म्याचा नंबर आहे. तपासून घ्या बंर असं म्हणत अंधारेंनी पलटवार केला.
प्रिय @samant_uday भाऊ, प्रिय @NiteshNRane महाप्रबोधनयात्रेची आपली काळजी नाहक आहे. रिकाम्या खुर्च्यांचे पोस्ट केलेले फोटो शिंदेसाहेबांच्या वरळी सभेचे आहेत. महाप्रबोधन यात्रेचे ओरिजनल फोटो पाठवत आहे.
आणि हो चष्म्याचा नंबर आहे तपासून घ्या बरं..@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm pic.twitter.com/jVG7qBKdXL— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 21, 2023
शकुनीमामा चा बीड मध्ये FLOP शो !!
महा प्रबोधन म्हणे!!! 😅 pic.twitter.com/Ysk2cj3zJZ
— nitesh rane (@NiteshNRane) May 20, 2023
कृपया माझी विनंती आहे.. ही सभा महाप्रबोधन सभा आहे की नाही आपणच ठरवावे…. झूम करून पहावे.. pic.twitter.com/DKOHGa8aXr
— Uday Samant (@samant_uday) May 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“रेडे कापण्यासाठी शिंदे गटाने पापुआ न्यु गिनीला जावे”, राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल
हेही वाचा…“..तर सामान्य लोकांच्या पोरांनी काय करावं, वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…घरातले दागिने विकून, पैशांची उधळण करत शेतकरी आक्रमक, ७०० पेक्षा बोगस कंपन्यांंवर कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…“2024 नंतर ईडीच्या कारवायात ‘कुणाला’ तुरूंगात पाठवयाचं, त्या यादी तयार करू,” संजय राऊत
हेही वाचा…“ज्या पंतप्रधानांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रंचड आरोप, काही काळ होते फरारी”