नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पापुआ न्यू गिनी देशाच्या दौऱ्यावर असून ते एचआयपीआयसी शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. त्याआधी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे हजर होते. यावेळी जेम्स मारापे यांनी विमानतळावर मोदींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. हा फोटा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शाब्दिक टोला हाणला आहे.
हेही वाचा…सरकारच्या सचिवालात सापडल्या २ हजार रूपयांच्या ‘७,२९८’ नोटा, १ किलोचं सोन्याचं बिस्किट, नोटा कुणाच्या ?
पापुआ न्यू गिनी देश कुठे आहे हे तुम्हाला तरी माहिती आहे का? तो फोटो नीट पाहिला तर त्यांनी मोदींचे चरणस्पर्श नव्हे तर गुडघ्याला पाया पडले आहेत. पाया पडणे हे गैर नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांच्या पाया पडायला हवे. आम्ही देखील तेच करतो. परंतु. ६० लाख लोकसंख्येच्या पापुआ न्यू गिनी देश आहे. पुर्णपणे आदिवाशी देश आहेत. त्यांचा जगाशी काही संबंध नाही. ज्या पंतप्रधानांनी मोदींचे चरणस्पर्श केले. त्या जेम्स मरापेंवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत. काही काळातीसाठी ते फरारी झाले होते. त्यांनी चरणस्पर्श केला त्याचा आंनद आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“वंचितला आघाडीत घेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे”, प्रकाश आंबेडकर
दरम्यान, मोदी सध्या तीन देशाचे दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहेत. मोदी यांनी पापुआ न्यू गिनीत आयोजित एचआयपीआयसी शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“आता ‘टिल्लूपासून उल्लु’पर्यंत आता सर्वांची वरात निघेल”, जयंत पाटलांच्या इडी कारवाईवरून राष्ट्रवादीने दिला भाजपला इशारा
हेही वाचा…“जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचं ‘तुफान’ मुंबईत धडकलं..! ‘मोदी चोर है’च्या घोषणा
हेही वाचा…“भाजपकडून पडळकरांना मंत्रीपद दिल्यानंंतर शिंदे साहेबांनी मग बिचकुलेंना मंत्रीपद द्यावं”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…सोलापुरात भाजपचा मोठा ‘मासा’ काॅंग्रेसच्या गळाला..! भाजप गोटात मोठी अस्वस्थता
हेही वाचा…“त्र्यंबकेश्वरच्या मुद्दावरून कुणाला दंगली घडवायच्या आहेत का?” राज ठाकरेंनी राजकारणी नेत्यांना सुनावलं