मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे दिल्याने शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारमधील उर्वरित मंत्रिमंडळ विस्ताराच्या आशा उंचावल्या आहेत. यातच आता भाजपच्या नेत्यांकडून मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं आहे.
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घ्या,” भाजप नेत्यांना केंद्रातून सूचना, वातावरण तापणार ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्र्यांसह एकूण २० मंत्री असून अजून २२ मंत्रिपद रिक्त आहेत. यासाठी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी चढाओढ सुरू आहे. यावरून भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान भेटत असेल तर शिंदे साहेबांनी शिवसेनेकडून तोडीत तोड म्हणून अभिजित बिचुकले यांना मंत्री म्हणून संधी दिली पाहिजे. असा खोचक टोला राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी लगावला आहे.
हेही वाचा…अजित पवार म्हणतात, “चार दिवस सासूचे, चार सुनेचे दिवस असतात”
दरम्यान, भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादीवर टिका करीत आहेत. तर टिव्ही मालिकेतील आणि बिग बाॅस फेम अभिजित बिचकुले यांनी अनेक राज्यातील निवडणुका लढविल्या आहेत. यावरून सुरज चव्हाण यांनी त्यांच्यावरून भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
भाजप कडून गोपीचंद पडळकर यांना मंत्रीमंडळात स्थान भेटत असेल तर शिंदे साहेबांनी शिवसेनेकडून तोडीस तोड म्हणून अभिजित बिचुकले यांना मंत्री म्हणून संधी दिली पाहिजे.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) May 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सोलापुरात भाजपचा मोठा ‘मासा’ काॅंग्रेसच्या गळाला..! भाजप गोटात मोठी अस्वस्थता
हेही वाचा…“त्र्यंबकेश्वरच्या मुद्दावरून कुणाला दंगली घडवायच्या आहेत का?” राज ठाकरेंनी राजकारणी नेत्यांना सुनावलं
हेही वाचा…सरकारच्या सचिवालात सापडल्या २ हजार रूपयांच्या ‘७,२९८’ नोटा, १ किलोचं सोन्याचं बिस्किट, नोटा कुणाच्या ?
हेही वाचा…“वंचितला आघाडीत घेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे”, प्रकाश आंबेडकर
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार येणार”