मुंबई : कर्नाटकमध्ये आजपासून नव्या पर्वाला सुरूवात झाली असून जनतेच्या आशा आकांशा पुर्व करण्याचे काम काॅंग्रेसचे हे नवे सरकार करेल. भाजपच्या भ्रष्ट्राचारी, धर्मांध, जातीयवादी सरकारला कंटाळेल्या जनतेने काॅंग्रेसला घवघवीत यश दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांधमध्ये कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही परिवर्तन घडवेल आणि राज्यात काॅंग्रेसचे सरकार येईल. असा विश्वास काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. आज बंगरूळूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर सिद्रमय्या यांनी कर्नाटक राज्याच्या नव्या मुख्यमंत्री तर डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…मुनगंटीवारांनी दिलेलं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्विकारलं, आता मोठा राजकीय धमाका होणार ?
भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारने कर्नाटकात डबल भ्रष्टाचार केला व जनतेचा पैसा लुटला. सामान्य जनतेच्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करुन केवळ धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर मतं मागितली परंतु कर्नाटकची सुज्ञ जनता भाजपाच्या भुलथापांना बळी पडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रातील डझनभर मंत्री यांनी प्रचारसभांचा धडाका लावला पण कर्नाटकच्या जनतेवर त्याचा काहीही फरक पडला नाही. महाराष्ट्रातही कटकारस्थान करून आलेले डबल इंजिनचे सरकार जनतेच्या मनातून उतरलेले आहे.
हेही वाचा…उद्याच होणार राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार! फडणवीसांच्या दिल्लीवारीत यादीला हिरवा कंदील?
भाजपाप्रणित शिंदे सरकारचा आगामी निवडणुकीत जनताच पराभव करेल. कर्नाटकातील काँग्रेस सरकार जनतेला दिलेली पाच महत्वाच्या आश्वासनांची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेटपासूनच सुरु होईल. जनतेला दिलेली आश्वासने पाळणारे काँग्रेस सरकार असून महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार असताना दिलेल्या आश्वासनानुसार पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला होता. राज्यात सध्या असलेले शिंदे सरकार शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला, छोटे व्यापारी यांना उद्ध्वस्त करणारे आहे. या सरकारला आगामी निवडणुकांत कर्नाटकाप्रमाणेच त्यांची जागा दाखवून जनता काँग्रेसला विजयी करेल, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घ्या,” भाजप नेत्यांना केंद्रातून सूचना, वातावरण तापणार ?
हेही वाचा…अजित पवार म्हणतात, “चार दिवस सासूचे, चार सुनेचे दिवस असतात”
हेही वाचा…काॅंग्रेसचा तगडा नेता, फडणवीसांची भेट, भाजपमध्ये जाणार का? दिले उत्तर, म्हणाले…
हेही वाचा…“द्वेषाच्या बाजारात कर्नाटकच्या लोकांनी प्रेमाचं दुकान उघडलं”, राहुल गांधी
हेही वाचा…“आदुबाळ, तुझ्या जन्माच्या आधीपासून शिंदे साहेब…”शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं