सोलापुर : कर्नाटकच्या विजयानंतर काॅंग्रेसला राज्यातही मोठं बळ प्राप्त झालं आहे. याचाच परिणाम म्हणून सोलापुरात भाजपचा मोठा मासा काॅंग्रेसच्या गळाला लागला आहे. त्यामुळे याचा भाजपला जबरदस्त धक्का बसला असून भाजप गोटात अस्वस्थता पसरली आहे. याचा आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…अजित पवार म्हणतात, “चार दिवस सासूचे, चार सुनेचे दिवस असतात”
सोलापुरात भाजपचं मोठं वचर्स्व असून सोलापुरात उत्तर मतदारसंघात व दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. या दोन्ही आमदारांचे आडनावं देशमुख असून या दोन्ही देशमुखांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून भाजप पक्ष सोडतत असल्याचं सांगत प्रा. अशोक निंबर्गी यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रा. अशोक निंबर्गी यांनी पक्ष प्रवेश केला आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसचा तगडा नेता, फडणवीसांची भेट, भाजपमध्ये जाणार का? दिले उत्तर, म्हणाले…
प्रा. निंबर्गी हे पुर्वी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे कंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. नंतर देशमुख यांच्याशी बिनसल्याने ते आमदार सुभाष देशमुख यांच्या गटात सहभागी झाले. तेव्हापासून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील गट म्हणून अशोक निंबर्गी यांच्यासह इथर सहकाऱ्यांकडे पाहिजे जायचे. मात्र गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याचें निंबर्गी यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“त्र्यंबकेश्वरच्या मुद्दावरून कुणाला दंगली घडवायच्या आहेत का?” राज ठाकरेंनी राजकारणी नेत्यांना सुनावलं
हेही वाचा…सरकारच्या सचिवालात सापडल्या २ हजार रूपयांच्या ‘७,२९८’ नोटा, १ किलोचं सोन्याचं बिस्किट, नोटा कुणाच्या ?
हेही वाचा…“वंचितला आघाडीत घेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे”, प्रकाश आंबेडकर
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार येणार”
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घ्या,” भाजप नेत्यांना केंद्रातून सूचना, वातावरण तापणार ?