नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेने भारतीय चलनातून २००० रूपयाच्या नोटा मागे घेत असल्याची घोषणा केली. रिझर्व्ह बॅंकेने याबाबत एक पत्रक काढून दोन हजाराच्या नोटा २१ सप्टेंबर पर्यंत जमा करण्याचे ही सांगितले आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये दोन हजाराच्या नोटांचा घबाड सापडल्याने एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“द्वेषाच्या बाजारात कर्नाटकच्या लोकांनी प्रेमाचं दुकान उघडलं”, राहुल गांधी
राजस्थान सरकारच्या सचिवालयाजवळ असलेल्या योजना भवनाच्या बेसमेंटमध्ये २ कोटी ३१ लाख रूपयांपेक्षा अधिकची रक्कम आणि एक किलो वजनाचं सोन्याचं बिस्किट सापडलं आहे. यामध्ये २००० रूपयांच्या ,२९७ नोटा असून त्यांचं मुल्य १ कोटी ४५ लाख ९६ हजार रूपये इतकं आहे. तर त्याच ठिकाणी ५०० रूपयांच्या १७, हजार १०७ नोटा असून त्यांच मुल्य हे ८५ लाख ५३ हजार ५०० आहे. यासोबतच एक किलो वजनाचं बिस्किट सापडलं आहे. त्यावर मेड इन स्वित्झर्लंड असा उल्लेख असून त्यांचं मुल् हे ६२ लाख रूपयांच्या घरात आहे.
हेही वाचा…“आदुबाळ, तुझ्या जन्माच्या आधीपासून शिंदे साहेब…”शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
दरम्यान, योजना भवनात असलेल्या जुन्या फाईल्स काढून त्यांचं संगणकीकरम करण्याचं काम सुरू होतं. या दरम्यान योजना भवनातील बेसमेंटमधील कपाटांमध्ये पडून असलेल्या फाईल शोधल्या जात होत्या. त्यावेळी दोन कपाटांच्या चाव्या मिळाल्या नाहीत. या कपाटांच्या किल्ल्या शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र त्या सापडल्या नाहीत. शुक्रवारी श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषद घेतली.
READ ALSO :
हेही वाचा…“वंचितला आघाडीत घेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे”, प्रकाश आंबेडकर
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार येणार”
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घ्या,” भाजप नेत्यांना केंद्रातून सूचना, वातावरण तापणार ?
हेही वाचा…अजित पवार म्हणतात, “चार दिवस सासूचे, चार सुनेचे दिवस असतात”
हेही वाचा…काॅंग्रेसचा तगडा नेता, फडणवीसांची भेट, भाजपमध्ये जाणार का? दिले उत्तर, म्हणाले…