पुणे : आयएल आणि एफएस या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांची इडीकडून चौकशी सुरू आहे. जयंत पाटलांवर इडीने कारवाई केल्याने आज संपुर्ण राज्यात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत ईडी आणि भाजपच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं असून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“वंचितला आघाडीत घेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे”, प्रकाश आंबेडकर
जंयत पाटलांना आयएल आणि एफएस या कंपनीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी इडीने नोटीस धाडली आहे. त्याचंसंदर्भात जंयत पाटलांना ईडीने दोनदा नोटीस पाठविली होती. त्यानंतर आज जंयत पाटील पायी चालत याप्रकरणी संदर्भात पायी चालत इडीच्या कार्यालयात जात आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून मोदी चोर असल्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईतील इडीच्या कार्यालयासमोरील परिसर मोदी चोर है च्या घोषणांनी दणादणून गेला आहे.
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार येणार”
फक्त राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट करणाऱ्या भाजपाने स्वत:चे सरण रचले आहे, हे मात्र नक्की आहे. ज्या पद्धतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात यांचं तोंड पोळलंय तसंच याही प्रकरणात हे उघडे पडतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नुकतेच ईडी कार्यालयात दाखल आहेत. हा प्रसंग पाहून भाजप व शिंद गटातील जे आसूरी आनंद घेत असतील त्यांच्या चौकशीला प्रत्यक्ष क्षण लवकरच. असं म्हणत टिल्लूपासून उल्लु पर्यंत आता सर्वांची वरात निघेल. असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर साधला आहे.
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घ्या,” भाजप नेत्यांना केंद्रातून सूचना, वातावरण तापणार ?
दरम्यान, भाजप सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर इडी या स्वायत्त विभागाचा घरगडी करून गैरवापर करत आहे. भजापच्या सूडबुद्धी वृत्तीला व भाजपच्या इडीला काडी लावल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता थांबणार नाही. असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपला दिला आहे.
राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब नुकतेच ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत,हा प्रसंग पाहुन भाजपा व शिंदे गटातील जे आसुरी आनंद घेत असतील त्यांच्या चौकशीचा प्रत्यक्ष क्षण लवकरच!. टिल्लू पासुन उल्लू पर्यंत सर्वांची वरात निघेल #यादीतयार
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 22, 2023
फक्त राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट करणाऱ्या भाजपा ने स्वतःचे सरण स्वतःच रचले आहे हे मात्र नक्की. जसे मा. गृहमंत्री श्री अनिल देशमुख ह्यांच्या प्रकरणात यांचं तोंड पोळलंय तसंच याही प्रकरणात हे उघडे पडतील.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचं ‘तुफान’ मुंबईत धडकलं..! ‘मोदी चोर है’च्या घोषणा
हेही वाचा…“भाजपकडून पडळकरांना मंत्रीपद दिल्यानंंतर शिंदे साहेबांनी मग बिचकुलेंना मंत्रीपद द्यावं”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…सोलापुरात भाजपचा मोठा ‘मासा’ काॅंग्रेसच्या गळाला..! भाजप गोटात मोठी अस्वस्थता
हेही वाचा…“त्र्यंबकेश्वरच्या मुद्दावरून कुणाला दंगली घडवायच्या आहेत का?” राज ठाकरेंनी राजकारणी नेत्यांना सुनावलं
हेही वाचा…सरकारच्या सचिवालात सापडल्या २ हजार रूपयांच्या ‘७,२९८’ नोटा, १ किलोचं सोन्याचं बिस्किट, नोटा कुणाच्या ?