मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इडीने नोटीस पाठवल्यानंतर आज ते चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल होत आहे. याचा निषेध म्हणून आज संपुर्ण राज्यभरात राष्ट्रवादीने आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. मुंबईत देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून इडीच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. यातच आज जयंत पाटील पायी चालत इडीच्या कार्यालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आज सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार येणार”
जंयत पाटलांना आयएल आणि एफएस या कंपनीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी इडीने नोटीस धाडली आहे. त्याचंसंदर्भात जंयत पाटलांना ईडीने दोनदा नोटीस पाठविली होती. त्यानंतर आज जंयत पाटील पायी चालत याप्रकरणी संदर्भात पायी चालत इडीच्या कार्यालयात जात आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून मोदी चोर असल्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईतील इडीच्या कार्यालयासमोरील परिसर मोदी चोर है च्या घोषणांनी दणादणून गेला आहे.
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घ्या,” भाजप नेत्यांना केंद्रातून सूचना, वातावरण तापणार ?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना देखील इडीची नोटीस आल्यानंतर राष्ट्रवादीने मुंबईत मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. आज त्याचा प्रत्यय आज मुंबईत दिसून येत आहेत. त्यामुळे राज्यात आता इडीच्या कारवायामुळे विरोधी पक्षांकडून आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.
हेही वाचा…अजित पवार म्हणतात, “चार दिवस सासूचे, चार सुनेचे दिवस असतात”
दरम्यान, आयएल आणि एफएस या कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून जंयत पाटलांवर करण्यात आला आहे. त्यावरूनच इडीकडून जयंत पाटलांची चौकशी केली जात आहे. या गैरव्यवहार एकाच व्यक्तीला अनेक कंत्राट मिळाली असल्याने याच व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा इडीला संशय आहे. यामध्ये जंयत पाटलांचं नाव समोर आलं असून याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचंही नाव आलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपकडून पडळकरांना मंत्रीपद दिल्यानंंतर शिंदे साहेबांनी मग बिचकुलेंना मंत्रीपद द्यावं”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…सोलापुरात भाजपचा मोठा ‘मासा’ काॅंग्रेसच्या गळाला..! भाजप गोटात मोठी अस्वस्थता
हेही वाचा…“त्र्यंबकेश्वरच्या मुद्दावरून कुणाला दंगली घडवायच्या आहेत का?” राज ठाकरेंनी राजकारणी नेत्यांना सुनावलं
हेही वाचा…सरकारच्या सचिवालात सापडल्या २ हजार रूपयांच्या ‘७,२९८’ नोटा, १ किलोचं सोन्याचं बिस्किट, नोटा कुणाच्या ?
हेही वाचा…“वंचितला आघाडीत घेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे”, प्रकाश आंबेडकर