मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आता जागावाटपावरून महाविकास आघाडीत भाऊ बंदकी सुरू झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचं सांगत महाविकास आघाडीत वचर्स्व मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर आता राऊतांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…घरातले दागिने विकून, पैशांची उधळण करत शेतकरी आक्रमक, ७०० पेक्षा बोगस कंपन्यांंवर कारवाई करण्याची मागणी
याअगोदरच्या निवडणुकीत काॅंग्रेसला अधिक जागा मिळायच्या. तेव्हा जागावाटपात आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी जागा मिळायच्या. आता आम्ही काॅंग्रेसचे मोठे भाऊ झालो आहोत. काॅंग्रेसचे ४४, तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. असं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. आजच्या स्थितीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. काॅंग्रेस दोन नंबर, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन नंबरला आहे. त्यामुळे काही विधानं करण्यात चुकीचं नाही. पण अशा वक्तव्यांना फारसं महत्व नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यात उत्साह वाढविण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“2024 नंतर ईडीच्या कारवायात ‘कुणाला’ तुरूंगात पाठवयाचं, त्या यादी तयार करू,” संजय राऊत
महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ आहे? कोण लहान भाऊ? हे पाहण्यासाठई आता डीएनए टेस्ट करावी लागेल. अजित पवार काय म्हणतात किंवा कोण काय म्हणतो. याला जास्त महत्व देण्याची आवशक्यता नाही. आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशा भूमिक घ्याव्या लागतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आमचे १८ खासदार जिंकले होते. आमचा तो आकडा कायम राहिलच. असं राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“ज्या पंतप्रधानांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रंचड आरोप, काही काळ होते फरारी”
दरम्यान, यातच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने ३६ ते ३७ जागा लढावाव्यात आणि ठाकरे गटाने १२ ते १४ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दिला जाऊ शकतो. अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव ठाकरे गटाला मान्य असणार का ? हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…” आघाडीत आता राष्ट्रवादीचं मोठा भाऊ,..” अजित पवार अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये रंगला कलगीतूरा
हेही वाचा…भाजपविरूद्ध आघाडीने रणशिंग फुंकलं..! ‘१६ जून’ आघाडीचा मोर्चा महापालिकेवर धडकणार
हेही वाचा…“ते फोटो बीडचे नाही तर शिंदेंच्या वरळीतील सभेचे,” ठाकरे गटाने फोटो पाठवत भाजप अन् शिंदे गटाचं पितळ उघड पाडलं
हेही वाचा…“रेडे कापण्यासाठी शिंदे गटाने पापुआ न्यु गिनीला जावे”, राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल
हेही वाचा…“..तर सामान्य लोकांच्या पोरांनी काय करावं, वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार”, सुप्रिया सुळे