मुंबई : राज्यात आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून त्याची तयारीही त्यांनी सुरू करून दिली आहे. यातच आता राज्यात कोण मोठा भाऊ ? यावरून वाद सुरू झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून आता काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“2024 नंतर ईडीच्या कारवायात ‘कुणाला’ तुरूंगात पाठवयाचं, त्या यादी तयार करू,” संजय राऊत
याअगोदरच्या निवडणुकीत काॅंग्रेसला अधिक जागा मिळायच्या. तेव्हा जागावाटपात आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी जागा मिळायच्या. आता आम्ही काॅंग्रेसचे मोठे भाऊ झालो आहोत. काॅंग्रेसचे ४४, तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. असं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. आजच्या स्थितीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. काॅंग्रेस दोन नंबर, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन नंबरला आहे. त्यामुळे काही विधानं करण्यात चुकीचं नाही. पण अशा वक्तव्यांना फारसं महत्व नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यात उत्साह वाढविण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“ज्या पंतप्रधानांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रंचड आरोप, काही काळ होते फरारी”
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात एकत्रित लढणार असून महाविकास आघाडीत आता जागा वाटपावरून वाद सुरू आहे. यातच आता जागावाटापासाठी समिती स्थापण करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीतून देण्यात आली आहे. यातच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपविरूद्ध आघाडीने रणशिंग फुंकलं..! ‘१६ जून’ आघाडीचा मोर्चा महापालिकेवर धडकणार
हेही वाचा…“ते फोटो बीडचे नाही तर शिंदेंच्या वरळीतील सभेचे,” ठाकरे गटाने फोटो पाठवत भाजप अन् शिंदे गटाचं पितळ उघड पाडलं
हेही वाचा…“रेडे कापण्यासाठी शिंदे गटाने पापुआ न्यु गिनीला जावे”, राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल
हेही वाचा…“..तर सामान्य लोकांच्या पोरांनी काय करावं, वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…घरातले दागिने विकून, पैशांची उधळण करत शेतकरी आक्रमक, ७०० पेक्षा बोगस कंपन्यांंवर कारवाई करण्याची मागणी