पुणे : भाजपची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कारभाराविषयी महाविकास आघाडीने येत्या १६ जून रोजी पोलखोल मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार असून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एल्गार फुकारला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“ज्या पंतप्रधानांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रंचड आरोप, काही काळ होते फरारी”
लाल महाल येथून १६ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता या मोर्चाला सुरूवात होणार असून त्यानंतर हा मोर्चा महानगरपालिकेवर धडकरणार आहे. या मोर्चामध्ये समान पाणीपुरवठा योजना आणि विविध कामांच्या निविंदामधील भ्रष्टाचाराची पोलखोल आहे. या मोर्चानंतर महानगरपालिकेसमोरच होणाऱ्या सभेला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि आदित्य ठाकरे संबोधित करणार आहेत.
हेही वाचा…“आता ‘टिल्लूपासून उल्लु’पर्यंत आता सर्वांची वरात निघेल”, जयंत पाटलांच्या इडी कारवाईवरून राष्ट्रवादीने दिला भाजपला इशारा
“महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाचं महामोर्चाचं आयोजन 16 जुनला पुण्यात करण्यात आलं आहे. या सभेला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे या सभेला उपस्थित राहणार आहे. या सभेत भाजपच्या पाच वर्षातील महानगरपालिकेतील ४० हजार कोटीचं बजेट मधून पुणे करांना काय मिळालं. ? हे पुणे महानगरपालिकेने स्पष्ट करावं. तसेच अनेक प्रकल्पामध्ये भ्रष्ट्रचार झाल्याचंही उघड झालं आहे.” अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशात जगताप यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ते फोटो बीडचे नाही तर शिंदेंच्या वरळीतील सभेचे,” ठाकरे गटाने फोटो पाठवत भाजप अन् शिंदे गटाचं पितळ उघड पाडलं
हेही वाचा…“रेडे कापण्यासाठी शिंदे गटाने पापुआ न्यु गिनीला जावे”, राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल
हेही वाचा…“..तर सामान्य लोकांच्या पोरांनी काय करावं, वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…घरातले दागिने विकून, पैशांची उधळण करत शेतकरी आक्रमक, ७०० पेक्षा बोगस कंपन्यांंवर कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…“2024 नंतर ईडीच्या कारवायात ‘कुणाला’ तुरूंगात पाठवयाचं, त्या यादी तयार करू,” संजय राऊत