जळगाव : कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांची कन्या केतकी पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद अजून वाढली आहे. सुरूवातीपासून भाजपने लोकसभा मतदारसंघावर वरचष्मा ठेवला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपने मोठी रणनिती आखली असून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा पत्ता कट करून उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
गेल्या अनेक महिन्यांपासून डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या केतकी पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यातच २२ जानेवारीच्या कार्यक्रमानंतर उल्हास पाटलांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आज उल्हास पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
डॉ. उल्हास पाटील यांनी १९९८ साली कॉंग्रेसमधून निवडणूक लढवली होती. मात्र तेरा महिन्याचा काळ त्यांना मिळाला होता. त्यानंतर मात्र मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी पराभव केला.
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान
सुरूवातीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे व्हिजन आवडत असल्याचे केतकी पाटील यांनी सांगत भाजपमध्ये जाण्यास आपण इच्छूक असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे उल्हास पाटील आणि केतकी पाटील यांच्या भाजप प्रवेशाने तसेच याठिकाणी रावेर लोकसभा मतदारसंघावर एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांच्यापासून भाजपची घट्ट पकड होत असताना उल्हास पाटील आणि केतकी पाटील यांच्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा उमेदवारीसाठी खासदार रक्षा खडसे. डॉ. केतकी पाटील, अमोल जावळे यांच्यामध्ये चुरस निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे पाटलांना कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांचा दिला वेळ, मराठा आंदोलक माघारी फिरणार का ?
हेही वाचा…इंडिया आघाडीत सर्वात मोठी फुट ; ममता बॅनर्जींनंतर ‘या’ मुख्यमंत्र्यांनी देखील दिला स्वबळाचा नारा
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये दाखल, खासदार रक्षा खडसे यांना मोठा धक्का, उमेदवारी जाणार?
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर भाजपची अयोध्यावारी, मुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल