जळगाव : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपाध्यक्ष तशा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या कन्या केतकी पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसला याठिकाणी मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा….अखेर प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान..! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यामान खासदार रक्षा खडसे यांचा पत्ता कट होणार आणि केतकी पाटील यांना पुढील लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळणार अशी चर्चा राजकारणात सुरू होती. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेसमधून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता उल्हास पाटलांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“आता आरक्षणातच माझा राम, मुंबई हीच अयोध्या”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत
दरम्यान, केतकी पाटील यांच्या भाजप प्रवेशाने रक्षा खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांच्या जागी केतकी पाटील यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर भाजपची अयोध्यावारी, मुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान
हेही वाचा…राम मंदिराच्या सोहळ्यापुर्वी दोन गटात मोठा राडा, श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर