छत्रपती संभाजीनगर : दोन गटांमध्ये झालेल्या वादात घाटी रूग्णालयातील निवासी महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींवर उपचार करत असताना अचानक आलेल्या ८ ते १० जणांच्या टोळकी रूग्णालयात घुसरील. त्यांनी महिला डॉक्टराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामुळे महिला डॉक्टराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी घाटी रूग्णालय प्रशासनाने रूग्णालय त्याच्यासोबत आलेल्यांविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून आता काॅंग्रेसने जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
खोके सरकारच्या काळात संपूर्ण राज्यभर कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. गृहमंत्री फडणवीस मोदी भक्तीत व्यस्त असून त्यांना राज्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुख्यमंत्री व दुसरे उपमुख्यमंत्री त्यांना काही बोलूही शकत नाहीत. छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरु असताना एका तरुणाला रॉडने मारहाण करण्यात आली यात एका महिला डॉक्टरचं डोकं फुटलं…. खोके सरकारच्या काळात संपूर्ण राज्यभर गुन्हेगारी जबरदस्त फोफावली आहे आणि गुंड प्रवृत्तीने सर्व प्रमुख शहरात डोकं वर काढलं आहे. असा जोरदार घणाघात काॅंग्रेसने केला आहे.
हेही वाचा…“नाशिकच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करणार 11 दिवसांचे अनुष्ठान”
दरम्यान, घाटी रूग्णालयात रात्री साडेआठच्या सुमारास दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत महिला डॉक्टराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारण्यात आला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने महिला डॉक्टराचे डोके फुटले. या प्रकरणी घाटी प्रशासनाने रूग्णालय त्यांच्यासोबत आलेल्या विरूद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रा र दिलीय. दोन गटांमध्ये घाटी रूग्णालयामध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये एका गटातील जखमी शेख सय्यद शेख समशेर आणि शेख शेखिल शेख समशेर हे उपचारासाठी घाटीतील अपघात विभागात दाखल झाले होते.
खोके सरकारच्या काळात संपूर्ण राज्यभर कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. गृहमंत्री फडणवीस मोदी भक्तीत व्यस्त असून त्यांना राज्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुख्यमंत्री व दुसरे उपमुख्यमंत्री त्यांना काही बोलूही शकत नाहीत. छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरु असताना एका तरुणाला… pic.twitter.com/zRdD3bzOgS
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“माता, बहिणी मुलींवर शिव्या देऊन नका, अपशब्द वापरू नका”, नरेंद्र मोदींचं मोठं आवाहन
हेही वाचा…“स्वत: न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय?” मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरे गटाचा सवाल
हेही वाचा…“एका प्रामाणिक सहकाऱ्याला गमावलं”, युवा संघर्ष यात्रेतला हृषिकेश म्हस्के यांचं निधन, रोहित पवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
हेही वाचा…घाटी रूग्णालयात २ गटात राडा, महिला डॉक्टराचं डोके फुटले, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, शरद पवार गटाची जहरी टिका
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट