मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जवळपास ३० हजार ५०० कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची भेट देणार आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१, २०० कोटी रूपये खर्च करून मुंबईत उभारण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार आहेत. त्यावरून आता ठाकरे गटाकडून जोरदार टिका करण्यात आलीय.
हेही वाचा…“भविष्यात हाच घटनाक्रम राष्ट्रवादीच्या बाबतीतही पाहायला मिळेल”, श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादीला केलं सावध
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बनलेला ड्रीम प्रोजेक्ट आहे. योग्य नियोजन, दूरदृष्टी, बैठका, पुलाच्या कामाची पाहणी आणि कोविड काळातही सातत्याने पाठपुरावा या सगळ्या गोष्टींचे यश असल्याचे सांगत आम्हाला याबाबत अभिमान आहे. असे ठाकरे गटाने सांगितले आहे.
हेही वाचा…“शरद भाऊंचं हिंदुत्व जागृतीचं काम स्वातीताई नेटाने पुढं नेतील”, चित्रा वाघ यांनी घेतली मोहोळ कुटुंबियांची भेट
दरम्यान, जून २०२२ गद्दारीमुळे सरकार पडेपर्यंत केवळ ३० महिन्यात ८५ टक्के पुलाचे काम आम्ही पुर्ण करून दाखवलं आणि उरलेल्या १५ टक्के कामासाठी दीड वर्ष घेऊन, आणि व्हीआयपीची वाट बघत त्यांनी उद्घाटन रखडून दाखवलं. हाच फरक आहे. विचार करा. स्वत: न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय? असा सवालही ठाकरे गटाने केला आहे.
होय,
आम्ही अभिमानाने सांगतो…
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बनलेला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे.योग्य नियोजन,
दूरदृष्टी,
बैठका,
पुलाच्या कामाची पाहणी
आणि
कोविड… https://t.co/fN8s6EOaAL— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“एका प्रामाणिक सहकाऱ्याला गमावलं”, युवा संघर्ष यात्रेतला हृषिकेश म्हस्के यांचं निधन, रोहित पवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
हेही वाचा…घाटी रूग्णालयात २ गटात राडा, महिला डॉक्टराचं डोके फुटले, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, शरद पवार गटाची जहरी टिका
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
हेही वाचा…“नाशिकच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करणार 11 दिवसांचे अनुष्ठान”