नाशिक : आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिन आहे. देशातील प्रत्येक तरूण त्यांच्या निष्ठेने आणि सक्षम भारतासाठी प्रयत्न करेल. तरूणांनी काही सुत्रावर ध्यान दिलं पाहिजे. मेड इन इंडिया प्रोडक्ट वापरा, कोणतीही नशा, ड्रग्जपासून लांब रहा. माता, बहिणी मुलींवर शिव्या देऊन नका. अपशब्द वापरू नका. असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने नाशकात तरूणांना केलं. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी प्रसिध्द काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. तर गोदाकाठी आरतीही केली. यातच नरेंद्र मोदी यांचा नशकात भव्य रोड शो देखील पार पडला.
हेही वाचा…“नाशिकच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करणार 11 दिवसांचे अनुष्ठान”
देशाची युवा पिढी तयार होत आहे. गुलामी आणि तणावापासून मुक्त आहे. आता युवा पिढी म्हणते विकास आणि विरासत. सरकारने अनेक योजना राबवून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला. भारत ही लोकशाहीची माता आहे. जर तुम्ही सक्रीय राजकारणात आलात तर परिवारवादाच्या राजकारणाला कमी करा. परिवादाच्या राजकारणाने देशाचं नुकसानं केलंय. असं म्हणत त्यांनी काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…“भविष्यात हाच घटनाक्रम राष्ट्रवादीच्या बाबतीतही पाहायला मिळेल”, श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादीला केलं सावध
दरम्यान, अनेक देशांसोबत सरकारने जे करार केले आहेत. सरकार नव्या संधीसाठी पुर्ण शक्तीने काम करत आहे. सरकार आज अॅनिमेशन, व्हिजुअल्स इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक सेक्टर्सना प्रमोट करत आहे. अॅटोमिक सेक्टेर, स्पेस यासारख्या क्षेत्रातही काम करत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात मागील सरकापेक्षा दुप्पट. तिप्पट काम केलं जात आहे. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“स्वत: न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय?” मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरे गटाचा सवाल
हेही वाचा…“एका प्रामाणिक सहकाऱ्याला गमावलं”, युवा संघर्ष यात्रेतला हृषिकेश म्हस्के यांचं निधन, रोहित पवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
हेही वाचा…घाटी रूग्णालयात २ गटात राडा, महिला डॉक्टराचं डोके फुटले, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, शरद पवार गटाची जहरी टिका
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट