कोल्हापुर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी इडी आणि आयटी विभागाने धाडी टाकल्या आहेत. सकाळपासून आतापर्यंत जवळपास 11 तास होऊन गेले तरी हसन मुश्रीफ यांच्या घरातील चौकशी संपलेली नसल्याने मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे आज कोल्हापुरातील राजकारण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे.
“कार्यकर्त्यांना अडवले, पत्रकारांना रोखले, पोलीस हतबल, यंत्रणा मुठीत” मुश्रीफांवर कारवाई
भाजप नेते किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर सातत्याने भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळेच आज त्यांच्या घरावर इडी आणि आयटी विभागाने छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच किरीट सोमय्यांचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळेही जाळले. तर कपडे काढून टाळ्या वाजून सोमय्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
“सत्तेसाठी भाजपसोबत केलेली हातमिळवणी शिंदे गटाला डोकेदुखी ठरतेय”
यावेळी मुश्रीफ समर्थकांनी भाजपच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी दिली आहे. इडीने धाड टाकल्यानंतर समर्कांनी सुरूवातीला संपुर्ण कागल बंदची हाक दिली होती. पण त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे आज संपुर्ण दिवस हसन मुश्रीफ यांची चौकशी करण्यात आली आहे.
Read also
- “गिरीश महाजांनाना ते क्रेडीट घेण्याची गरज नाही”; बंडखोर आमदारांचा गिरीश महाजनांना टोला
- “तुम्हीच आमच्या मनातील मुख्य़मंत्री..!” फडणवीसांकडे बोट दाखवून नवनीत राणांचं वक्तव्य
- “पदवीधर निवडणुकीतील तिकीटावरून भाजप-शिंदे गटात धुसफुस, अनेकांची नाराजी
- कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
- कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा