मुंबई : येत्या 30 जानेवारीला राज्याच्या विधान परिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणुक होऊ घातली आहे. त्यासाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र यामध्ये शिंदे गटाचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तसेच मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विचार केला गेला नसल्याने शिंदे गटात सध्या नाराजीचा सुर उमटत असतांना दिसत आहे.
“सोमय्या एक वेळ इतरांसोबत पंगा चालला मात्र ही माती वेगळी”; राष्ट्रवादीचा किरीट सोमय्यांना इशारा
यातच नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून नाशिकमध्ये शिंदे आणि भाजपमध्ये धुसफुस होतांना दिसत आहे. भाजपने परस्पर उमेदवार दिल्याने शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील व्यक्त केली असल्याचं समजत आहे.
“राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंच्या नावाची घोषणा”, राजेश टोपे, बनसोडे, चव्हाण यांना मोठी जबाबदारी
नाशिकमधून विदयमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काॅंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच दुसरीकडे नाशिकमधून डॉ. प्रशांत पाटील, केव्हीएन नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक इच्छुक आहेत. अशातच नगर शहारातील तरूण कार्यकर्ते धनंजय जाधव यांच्या नावाची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यामुळे नाराजीचा सुर बघायला मिळत आहे.
धनंजय मुंडेंवर ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार सुरू, जंयत पाटलांनी घेतली भेट
औरंगाबाद विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार विक्रम काळे यांचे नाव जाहीर झाले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील यांनी या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून निवडणुकप्रमुख म्हणून आमदार राजेशे टोपे, सहप्रमुख आमदार संजय बोनसोडे आणि समन्वयक म्हणून आमदार सतीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Read also
- कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
- कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
- “कार्यकर्त्यांना अडवले, पत्रकारांना रोखले, पोलीस हतबल, यंत्रणा मुठीत” मुश्रीफांवर कारवाई
- “सत्तेसाठी भाजपसोबत केलेली हातमिळवणी शिंदे गटाला डोकेदुखी ठरतेय”
- “दाल मैं कुछ काला..!, योगेश कदमांच्या अपघातांवर रामदास कदमांचा संशय