औरंगाबाद : राज्यात आता विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक, औरंगाबाद, नागपुर, कोकण शिक्षक या मतदारसंघात ह्या निवडणुकांसाठी मतदान येत्या 30 जानेवारीला होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. तर 4 फेब्रुवारीला मतदानाची सर्व प्रक्रिया पुर्ण होणार आहे. यातच आता औरंगाबाद विभागात भाजपने आणि राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
औरंगाबाद विभागाकडून भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. या विभागात प्रथमच प्रहार पक्षाकडून संजय तायडे पाटील लढणार अशी घोषणा बच्चू कडू यांनी मागेच केली आहे. तर मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुक, शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील, मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी अर्ज भरणार आहेत.
“डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत, बच्चू कडू यांना अपघात, दुचाकीस्वाराने उडवले”
औरंगाबाद विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार विक्रम काळे यांचे नाव जाहीर झाले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील यांनी या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून निवडणुकप्रमुख म्हणून आमदार राजेशे टोपे, सहप्रमुख आमदार संजय बोनसोडे आणि समन्वयक म्हणून आमदार सतीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Read also
- धनंजय मुंडेंवर ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार सुरू, जंयत पाटलांनी घेतली भेट
- “बिचाऱ्या त्या ऊर्फी जावेदच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवायची”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना टोला
- “विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय”, कारवाईनंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
- गुलाबी थंडीत मुश्रीफांना इडी अन् आयटीने घाम फोडला..! तो घोटाळा तरी काय आहे ?
- अतिथी देवो भवं..! आमच्याकडे पाव्हाणे आले, त्यांचे स्वागत करू..! मुश्रीफांच्या कारवाईवर सुळेंची प्रतिक्रिया