अमरावती : राज्यातील आमदारांच्या अपघातांची मालिका अजूनही सुरू आहे. आमदार विनायक मेटे यांचा अलिकडेच अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर भाजपचेच आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, आणि आमदार योगेश कदम यांचा अपघात झाला. अशातच आज प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा देखील शहरातील कठोरा नाका परिसरात अपघात झाला असून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
“राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या इडी सरकारकडून सुरूय”
अमरावती शहरातील कठोरा परिसरातील आराधना चौकात येथे रस्ता ओलांडतांना बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यांच्यावर आज अमरावतीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
“सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख”, अजित पवारांचं राजकीय घडामोडींवर भाष्य
आज सकाळी कठोरा चौकात झालं असं की, बच्चू कडू रस्ताच्या दुसऱ्या बाजूला उभी असलेल्या गाडीत बसण्याची रस्ता ओलांडत होते. यादरम्यान त्यांना काही क्षणातच भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकीस्वारीने धडक दिली. यावेळी ते रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार.! अजित पवारांनी दिले संकेत
दरम्यान, या अपघाताची माहिती खुद्द बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटवरून दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज सकाळी रस्ता क्राॅस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठिक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये. असं त्यांनी म्हटलं आहे. त्यातच कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची मुंबईतील रूग्णालयात भेट घेतली. त्यामुळे सध्या आमदारांच्या अपघातांची मालिका सुरू असल्याने अनेक कार्यकर्त्यांना याची चिंता वाटू लागली आहे.
Read also
- “स्वप्नभंग झालेल्या आमदारांची आता मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली”
- शिवसेना नेमकी कुणाची? तोपर्यंत धनुष्यबाणांवर सुनावणी घेऊ नका, ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
- “मी भजन जरी गायलं तरी लोक मला ट्रोल करतील, त्यामुळे मी..;” अमृता फडणवीस
- “हो मी उपटसुंभ, पवार कुटुंबाला उपटून टाकणार”; पडळकरांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील, राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंची चर्चा