मुंबई : शिवसेना नेमकी कुणाची? याबाबत आज निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगाने सुनावणी घेऊ नये. असं म्हटलं आहे.
राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार.! अजित पवारांनी दिले संकेत
शिवसेना, निवडणुक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा? याबाबतची सुनावणी आजपासून निवडणुक आयोगासमोर सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची करण्यात आलेली निवड बेकायदेशीय असल्याचा दावा शिंदे गटाचे वकिल अॅड. महेश जेठमलानी यांनी केला. अशिक्षित गरीब मतदारांसाठी निवडणुक चिन्ह महत्वाचे असते. त्या माध्यमातून पक्षाचा प्रचार होत असतो. असा दावा अॅड सिंह यांनी केला.
“आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा
यासाठी शिंदे गटाचे वकिल अॅड मनिंदर सिंह यांनी सादिक अली प्रकरणाचा हवाला दिला. कायद्यानुसार, शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणुक चिन्ह दिले पाहिजे असा युक्तिवाद केला. निवडणुक चिन्हाबाबत तातडीने निर्णय झाला पाहिजे असा मुद्दाही त्यांनी मांडला.
“आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होईल. अशी माहिती सीजेआय डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. तसेच सुप्रिम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की, या सत्तासंघर्शाची सुनावणी 14 फेब्रुवारीपासून सलग घेतली जाईल.
Read also
- “मी भजन जरी गायलं तरी लोक मला ट्रोल करतील, त्यामुळे मी..;” अमृता फडणवीस
- “हो मी उपटसुंभ, पवार कुटुंबाला उपटून टाकणार”; पडळकरांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील, राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंची चर्चा
- “राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या इडी सरकारकडून सुरूय”
- “सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख”, अजित पवारांचं राजकीय घडामोडींवर भाष्य