पुणे : मागील काही दिवसापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादीवर सातत्याने टिका करीत आहेत. यातच त्यांनी अजित पवारांवर प्रखर शब्दात एका पत्रकार परिषदेत टिका केली होती. त्यावर अजित पवारांना विचारले असता. त्यांनी गोपीचंद पडळकरांसारख्या उपटसुंभ माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. अशा शब्दात त्यांनी पडळकरांना सुनावलं. त्यावर आता परत गोपीचंद पडळकर यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे.
“आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा
गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर विचारले असता अजित पवार भडकले. ते म्हणाले की, अशा उपटसुंभ माणसाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. त्याच्यासंबंधित कुठलाही प्रश्न असेल तर त्यावर उत्तर द्यायला मी रिकामा नाही. त्याचा डिपॉजिट जप्त करून त्याला घरी पाठवून दिलं आहे. असा टोला अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.
“उपटसुंभ लोकांना उत्तर द्यायला मी बांधील नाही,” अजित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल
हो मी उपटसुंभ आहे, पवार कुटुंबाला उपटून टाकणार, असं प्रत्यु्त्तर गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे. अजित पवारांना उपटून टाकणार असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.
“संजय राऊतांची ती भविष्यवाणी खोटी ठरणार”; मंत्री दिपक केसरकर
दरम्यान, बरोबरी ठरवायचा अधिकार त्यांना कुणी दिला नाही. जनतेनी त्यांना जास्तीची मतं दिल्याने त्या मस्तीत त्यांनी जाऊ नये. त्या जनतेने अनेक लोकांना घरी बसवलं आहे. इंदिरा गांधींचा देखील पराभव झाला आहे. त्यामुळे अजित पवार किस झाड की पत्ती है, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना प्रत्यु्त्तर दिलं आहे.
Read also
- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील, राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंची चर्चा
- “राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या इडी सरकारकडून सुरूय”
- “सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख”, अजित पवारांचं राजकीय घडामोडींवर भाष्य
- राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार.! अजित पवारांनी दिले संकेत
- “आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा