मुंबई : काही महिन्यांपासून राज्यातील आमदारांच्या अपघातांची मालिका सुरू आहे. यातच आज प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्च कडू यांचा अपघात झाला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर आता खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच मागील दोन दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा अपघात झाला. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपुस केली.
“डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत, बच्चू कडू यांना अपघात, दुचाकीस्वाराने उडवले”
काही दिवसांपुर्वी परळीमध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला आणि छातीला मार बसला होता. त्यानंतर त्यांच्यावर परळीतील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज जंयत पाटील यांनी रूग्णायात जाऊन तब्येतीची विचारपुस केली.
“स्वप्नभंग झालेल्या आमदारांची आता मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली”
दरम्यान, दोन दिवसापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील धनंजय मुंडे यांची रूग्णालयात जाऊन चौकशी केली होती. आज बच्चू कडू यांचाही अपघात झाला आहे. त्याआधी भाजप आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा देखील अपघात झाला होता.
Read also
- “बिचाऱ्या त्या ऊर्फी जावेदच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवायची”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना टोला
- “विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय”, कारवाईनंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
- गुलाबी थंडीत मुश्रीफांना इडी अन् आयटीने घाम फोडला..! तो घोटाळा तरी काय आहे ?
- अतिथी देवो भवं..! आमच्याकडे पाव्हाणे आले, त्यांचे स्वागत करू..! मुश्रीफांच्या कारवाईवर सुळेंची प्रतिक्रिया
- मोठी बातमी..! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या घरी इडी अन् आयकर विभागाची धाड, राष्ट्रवादीचा तिसरा नेता रडारवर