पुणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल आणि पुण्यातील घरावर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत. आज सकाळीच हसन मुश्रीफ यांच्या घरावर इडी आणि आयकर विभागातील 20 अधिकारी पोहचले. त्यांच्या कागदपत्रांची सध्या तपासणी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“हो मी उपटसुंभ, पवार कुटुंबाला उपटून टाकणार”; पडळकरांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
हसन मुश्रीफ यांच्यावर इडी अन् आयकर विभागाने कारवाई केल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पुर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे लपवायला खरंच काहीही नाही. अतिथी देवो भवं. आमच्याकडे पाव्हाणे आले त्यांचे स्वागत करूच असं म्हणत राज्यात ईडी म्हणजेच एकनाथ देवेंद्र यांचे सरकार आहे. जे सरकारच्या विरोधात बोलतात. त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील, राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंची चर्चा
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,एक गोष्ट प्रांजळपणे मला या इडी सरकारला सांगायची आहे, ही अशी कटकारस्थाने करण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी आणि महागाी यावर लक्ष दिलं तर मायबाप महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होईल. असंही त्या म्हणाल्या. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. आमच्यावर इतके लोक आरोप करतात कारण त्याशिवाय त्यांची हेडलाईन होत नाही. माझे त्यांना नम्रपणे आवाहन आहे की, तुम्ही या गोष्टी करत रहा. हा तुमचा अधिकार आहे. पण सत्तेचा गैरवापर करण्याची परिसीमा या सरकारने गाठली आहे. असंही त्या म्हणाल्या.
“राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या इडी सरकारकडून सुरूय”
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांनी नव वर्षाच्या सुरूवातीलाच हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप लावला आहे. तसेच त्यांच्याच संबंधित कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मंत्री असतांना ग्रामविकास खात्यात टेंडर जावयाच्या कंपनीला देऊन 1500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
Read also
- मोठी बातमी..! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या घरी इडी अन् आयकर विभागाची धाड, राष्ट्रवादीचा तिसरा नेता रडारवर
- “डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत, बच्चू कडू यांना अपघात, दुचाकीस्वाराने उडवले”
- “स्वप्नभंग झालेल्या आमदारांची आता मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली”
- शिवसेना नेमकी कुणाची? तोपर्यंत धनुष्यबाणांवर सुनावणी घेऊ नका, ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
- “मी भजन जरी गायलं तरी लोक मला ट्रोल करतील, त्यामुळे मी..;” अमृता फडणवीस