कोल्हापुर : आज सकाळी सकाळी भर थंडीत राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्रीय तपाय यंत्रणांनी घाम फोडला आहे. आज कोल्हापुर येथील हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर छापेमारी सुरू झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर सातत्याने आरोप केले होते. त्याच्यावरूनच आज किरीट सोमय्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
“मी भजन जरी गायलं तरी लोक मला ट्रोल करतील, त्यामुळे मी..;” अमृता फडणवीस
कोल्हापुर येथील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप किरिट सोमय्यांनी केला होता. या कारखान्यातील 98 टक्के पैसा हा आर्थिक गैरव्यवहारातून जमावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्यात मुश्रीफ यांचे जावई मंगोली यांचाही प्रमुख सहभाग आहे. असा आरोप सोमय्यांनी केला आहे. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी सारखाना काही वर्षापूर्वी अवसायनात काढण्यात आला होता. हा कारखाना बिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला. विशेष म्हणजे बिस्क इंडीया कंपनी ही हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्या मालकीची आहे. या व्यवहारासाठी कोलकत्ता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली होती.
“हो मी उपटसुंभ, पवार कुटुंबाला उपटून टाकणार”; पडळकरांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
बिस्क इंडीया कंपनीला त्यापुर्वी कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नाही, तरीही कंपनीला हा कारखाना हस्तांतरीत करण्यात आला, यासाठी कोल्हापुर जिल्हा सहकारी बॅंकेने योग्य लिलाव केला नाही, असे आरोप करण्यात आले होते. कारखाना हस्तांतरीत करण्यासाठी केवळ बिस्क इंडीया कंपनीच कशी सापडली असा सवालही सोमय्यांनी केला होता.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील, राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंची चर्चा
भाजप नेते किरीट सोमय्यांनी नव वर्षाच्या सुरूवातीलाच हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप लावला आहे. तसेच त्यांच्याच संबंधित कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मंत्री असतांना ग्रामविकास खात्यात टेंडर जावयाच्या कंपनीला देऊन 1500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
Read also
- अतिथी देवो भवं..! आमच्याकडे पाव्हाणे आले, त्यांचे स्वागत करू..! मुश्रीफांच्या कारवाईवर सुळेंची प्रतिक्रिया
- मोठी बातमी..! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या घरी इडी अन् आयकर विभागाची धाड, राष्ट्रवादीचा तिसरा नेता रडारवर
- “डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत, बच्चू कडू यांना अपघात, दुचाकीस्वाराने उडवले”
- “स्वप्नभंग झालेल्या आमदारांची आता मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली”
- शिवसेना नेमकी कुणाची? तोपर्यंत धनुष्यबाणांवर सुनावणी घेऊ नका, ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद