पुणे : अमृता फडणवीस, केतकी चितळे, आणि कंगना राणावतला जो न्याय तुम्ही देता. तोच न्याय तुम्ही ऊर्फी जावेदला देखील दिला पाहिजे. नाहीतर तुम्ही यावर बोलू नका. याच कारण म्हणजे तुम्ही अडगळीत पडत चाललेल्यामुळे तुम्ही फक्त राजकारण, चर्चेत राहण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे अडगळीत पडलेली लोकं अशा प्रकारे चर्चेत राहण्यासाठी स्टॅंडबाजी करीत असतात. असा टोला सुषमा अंधारे यांंनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
“स्वप्नभंग झालेल्या आमदारांची आता मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली”
ज्यावेळी तुम्ही महिलांच्या वेशभुषाविषयी बोलता, त्यावेळी तुम्ही तुमच्या पक्षातील महिलांकडे लक्ष्य दिलं आहे का? असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना केला आहे. केतकी चितळे, अमृता फडणवीस, कंगना रणावत कसे कपडे घालते. त्यावर माझं काहीच हस्तक्षेप नाही. परंतु यांना कपडे घालण्याचा अधिकार आहे, मग तो ऊर्फी जावेदला देखील अशू शकतो. मग चित्रा वाघ ह्यावर का बोलत नाही. ?असा सवालही त्यांनी केला.
शिवसेना नेमकी कुणाची? तोपर्यंत धनुष्यबाणांवर सुनावणी घेऊ नका, ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
तसेच तुम्हाला रूपाली चाकरणकरांना खाली खेचून महिला आयोगावर बसायचं आहे का? असा सवाल करीत तसं असेल तर तुम्ही त्यांच्या पक्षाला सांगा. कोर्टात जा. त्यांना पायउतार व्हायला सांगा. असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच यासाठी बिचाऱ्या ऊर्फी जावेदच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवायची. असा टोलाही त्यांनी लगावला.
Read also
- “विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय”, कारवाईनंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
- गुलाबी थंडीत मुश्रीफांना इडी अन् आयटीने घाम फोडला..! तो घोटाळा तरी काय आहे ?
- अतिथी देवो भवं..! आमच्याकडे पाव्हाणे आले, त्यांचे स्वागत करू..! मुश्रीफांच्या कारवाईवर सुळेंची प्रतिक्रिया
- मोठी बातमी..! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या घरी इडी अन् आयकर विभागाची धाड, राष्ट्रवादीचा तिसरा नेता रडारवर
- “डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत, बच्चू कडू यांना अपघात, दुचाकीस्वाराने उडवले”