मुंबई : येत्या 30 जानेवारीला राज्याच्या विधान परिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणुक होऊ घातली आहे. त्यासाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र यामध्ये शिंदे गटाचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तसेच मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विचार केला गेला नसल्याने शिंदे गटात सध्या नाराजीचा सुर उमटत असतांना दिसत आहे. यावरून आता राष्ट्रवादीने राज्य सरकारला डिवचलं आहे.
“विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय”, कारवाईनंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
या राज्यात मुख्यमंत्री नेमकं कोण तेच कळेनासं झालंय. राज्यात म्हटलं तर महायुतीचं सरकार असलं तरी मुख्यमंत्र्याना डावलुनच निर्णय घेतले जात असल्याचं समोर आलंय. हे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंंचं म्हणणं आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची नियुक्ती केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मात्र बोटं दाखवलं जात आहे माझ्याकडे अशी नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
गुलाबी थंडीत मुश्रीफांना इडी अन् आयटीने घाम फोडला..! तो घोटाळा तरी काय आहे ?
याबाबत पोलीस दलही नाराज असल्याचं सूचक वक्तव्यही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दुसरीकडे, विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघासाठी जाहीर केलेल्या तीन उमेदवारांमध्ये एकही जागा शिंदे गटाला देण्याल आली नाही, यावरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस आहे. परस्पर उमेदवार जाहीर करून शिंदे गटाच्या जखमांवर उलट भाजपने मीठच चोळले आहे. त्यामुळे सत्तेसाठी केलेली ही हातमिळवणी आता एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाला डोकेदुखी ठरू लागली आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबाद शिक्षक मतदार संघ किरण पाटील आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी माजी मंत्री रणजित पाटील यांची उमेदवादी भाजपने जाहीर केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत यांच्या नावाची घोेषणा केली आहे.
Read also
- “दाल मैं कुछ काला..!, योगेश कदमांच्या अपघातांवर रामदास कदमांचा संशय
- “सोमय्या एक वेळ इतरांसोबत पंगा चालला मात्र ही माती वेगळी”; राष्ट्रवादीचा किरीट सोमय्यांना इशारा
- “राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंच्या नावाची घोषणा”, राजेश टोपे, बनसोडे, चव्हाण यांना मोठी जबाबदारी
- धनंजय मुंडेंवर ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार सुरू, जंयत पाटलांनी घेतली भेट
- “बिचाऱ्या त्या ऊर्फी जावेदच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवायची”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना टोला