पुणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी इडी आणि आयकर विभागाने छापे टाकले. त्यांच्या संबंधित सर्व पुणे आणि कागल घरांवर, नातेवाईकांच्या घराची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी सातत्याने हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोमय्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे.
किरीट सोमय्या जे आजवर कुठलाही आरोप सिद्ध करू शकले नाहीत. ज्यांनी भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याविरूद्ध अशीच चौकशी लावण्याचा प्रयत्न केला पण शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या फाईलही तितक्याच प्रामाणिकपणे बंद केल्या. सोमय्या एक वेळ इतरांसोबत पंगा चालला मात्र ही माती वेगळी आहे. असं म्हणत मिटकरी यांनी सोमय्यांना सुचक इशारा दिला आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांनी नव वर्षाच्या सुरूवातीलाच हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप लावला आहे. तसेच त्यांच्याच संबंधित कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मंत्री असतांना ग्रामविकास खात्यात टेंडर जावयाच्या कंपनीला देऊन 1500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
Read also
- “राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंच्या नावाची घोषणा”, राजेश टोपे, बनसोडे, चव्हाण यांना मोठी जबाबदारी
- धनंजय मुंडेंवर ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार सुरू, जंयत पाटलांनी घेतली भेट
- “बिचाऱ्या त्या ऊर्फी जावेदच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवायची”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना टोला
- “विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय”, कारवाईनंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
- गुलाबी थंडीत मुश्रीफांना इडी अन् आयटीने घाम फोडला..! तो घोटाळा तरी काय आहे ?