रत्नागिरी : मागील काही दिवसापासून आमदारांच्या गाडीच्या अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. यातच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा पोलादपुर नजीक चोळई घाटात अपघात झाला. या अपघातात त्यांना किरकोळ मार बसला असून त्यांना पुढील उपचारासाठी चोळई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता यावरून आमदार रामदास कदम यांनी या अपघातावरून संशय निर्माण केला आहे.
गुलाबी थंडीत मुश्रीफांना इडी अन् आयटीने घाम फोडला..! तो घोटाळा तरी काय आहे ?
या अपघाताची कसुन चौकशी सुरू असून ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. त्यांनी ब्रेक फेल झाल्याचं सांगितलं आहे. परंतु ज्यावेळी गाडीची तपासणी केली होती. त्यावेळी समजलं की गाडीचं ब्रेक फेल झालं नाही. तो ड्रायव्हर खोटं बोलत आहे आणि हा खोटं का बोलत आहे. याची चौकशी सुरू आहे. याचा अर्थ असा आहे की, दाल में कुछ काला है. त्याची कसून चौकशी करायला भाग पाडणार अस रामदाक कदम यांनी म्हटलं आहे.
योगेश कदम खेडकडून मुंबईच्या दिशेने जात असतांना पोलादपुर नजीक चोळई येथे अपघात झाला. मागून येणाऱ्या टॅंकरने योगेश कदम यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने त्यांची गाडी पुढे असलेल्या पोलीस गाडीला धडकली. सुदैवाने त्यांना या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र त्यांचा ड्रायव्हर दीपक कदम हे किरकोळ जखमी झाले आहे. यामध्ये त्यांच्या गाडीचा मागच्या भाग चक्काचुर झाला.
Read also
- “सोमय्या एक वेळ इतरांसोबत पंगा चालला मात्र ही माती वेगळी”; राष्ट्रवादीचा किरीट सोमय्यांना इशारा
- “राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंच्या नावाची घोषणा”, राजेश टोपे, बनसोडे, चव्हाण यांना मोठी जबाबदारी
- धनंजय मुंडेंवर ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार सुरू, जंयत पाटलांनी घेतली भेट
- “बिचाऱ्या त्या ऊर्फी जावेदच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवायची”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना टोला
- “विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय”, कारवाईनंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया