मुंबई : राज्यात सध्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. यासाठी नाशिक, औरंगाबाद, नागपुर, कोकण शिक्षक या मतदारसंघात निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आज कोकण विभागाकडून महाविकास आघाडीकडून बाळाराम दत्तात्रय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
धनंजय मुंडेंवर ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार सुरू, जंयत पाटलांनी घेतली भेट
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थितीत आघाडीकडून बाळाराम दत्तात्रय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे देखील उपस्थित होते. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने आज आणि उद्या उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहेत.
“बिचाऱ्या त्या ऊर्फी जावेदच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवायची”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना टोला
औरंगाबाद विभागाकडून भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. या विभागात प्रथमच प्रहार पक्षाकडून संजय तायडे पाटील लढणार अशी घोषणा बच्चू कडू यांनी मागेच केली आहे. तर मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुक, शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील, मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी अर्ज भरणार आहेत.
Read also
- “कार्यकर्त्यांना अडवले, पत्रकारांना रोखले, पोलीस हतबल, यंत्रणा मुठीत” मुश्रीफांवर कारवाई
- “सत्तेसाठी भाजपसोबत केलेली हातमिळवणी शिंदे गटाला डोकेदुखी ठरतेय”
- “दाल मैं कुछ काला..!, योगेश कदमांच्या अपघातांवर रामदास कदमांचा संशय
- “सोमय्या एक वेळ इतरांसोबत पंगा चालला मात्र ही माती वेगळी”; राष्ट्रवादीचा किरीट सोमय्यांना इशारा
- “राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंच्या नावाची घोषणा”, राजेश टोपे, बनसोडे, चव्हाण यांना मोठी जबाबदारी