अमरावती : गोवा, गुजरात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं तिथे न्यायासाठी लढणारा व्यक्ती आपण पाहिला. त्यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की,आपण उपमुख्यमंत्री आहात. पण ज्या प्रकारे तुमच्या कामाचा आवाका आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांची कामं करता ते पाहून आमच्या मनात आम्हाला हेच वाटतं की तुम्हीच आमचे मुख्यमंत्री आहात. असं व्यक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
“दाल मैं कुछ काला..!, योगेश कदमांच्या अपघातांवर रामदास कदमांचा संशय
राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचा प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अमरावती मतदारसंघातील शिक्षक मतदार संघातील भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या निवडणुक प्रचारार्थ संवाद सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
“सोमय्या एक वेळ इतरांसोबत पंगा चालला मात्र ही माती वेगळी”; राष्ट्रवादीचा किरीट सोमय्यांना इशारा
एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेविरोधात बंड करून भाजपचा हात धरला. त्यावेळी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. परंतु मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांना बसवण्यात आलं. यातच चंद्रकांत पाटलांनी देखील याची खंत मध्यंतरी व्यक्त केली होती.
“राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंच्या नावाची घोषणा”, राजेश टोपे, बनसोडे, चव्हाण यांना मोठी जबाबदारी
दरम्यान, औरंगाबाद विभागाकडून भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. या विभागात प्रथमच प्रहार पक्षाकडून संजय तायडे पाटील लढणार अशी घोषणा बच्चू कडू यांनी मागेच केली आहे. तर मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुक, शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील, मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी अर्ज भरणार आहेत.
Read also
- “पदवीधर निवडणुकीतील तिकीटावरून भाजप-शिंदे गटात धुसफुस, अनेकांची नाराजी
- कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
- कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
- “कार्यकर्त्यांना अडवले, पत्रकारांना रोखले, पोलीस हतबल, यंत्रणा मुठीत” मुश्रीफांवर कारवाई
- “सत्तेसाठी भाजपसोबत केलेली हातमिळवणी शिंदे गटाला डोकेदुखी ठरतेय”