नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष फुटीनंतर प्रथमच शिंदे गटाने माजी मंत्री राजेंद्र गुढा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी दाखल झाले. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिंदेवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“..तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”, गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद पेटला, खडसेंनी दिलं आव्हान
राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. प्रत्येक जण आता जोरदार प्रचार सभा घेत आहेत. यातच राजस्थानमधील हवामहल विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी प्रचार केला. यावरून आता स्वत: च्या पक्षाचा एकही उमेदवार नसताना केवळ भाडोत्री प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा परराज्यात वापर होण्याची इतिहासातील पहिलीच वेळ असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला.
हेही वाचा…“जितक्या नोंदी सापडतील त्याची श्वेतपत्रिका काढा,” ओबीसी महासंघाचं शिंदे समितीला पत्र
दरम्यान, राजस्थानमधील हवामहल विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी प्रचार केला. यावेळी एका प्रचार पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा हिंदू ह्यदय सम्राट असा उल्लेख करण्यात आल्याने त्यांच्यावर ठाकरे गटाने जोरदार टिका केली आहे. पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार! असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला.
स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार नसताना केवळ भाडोत्री प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा परराज्यात वापर होण्याची इतिहासातील पहिलीच वेळ. pic.twitter.com/8jYavyecCa
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) November 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“किती तो निर्लज्जपणा?” राजस्थानमध्ये प्रचारात एकनाथ शिंदेंचा ‘हिंदू ह्यदय सम्राट’ म्हणून उल्लेख
हेही वाचा…“..तर मंत्रीपदाचा राजीनामा देणार,”? छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, राजकारण आणखी तापणार
हेही वाचा…“महायुती सरकारने जनतेला बनवले मुर्ख,” लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आदेशास सरकारकडून स्थगिती
हेही वाचा…राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस, नक्की कारण काय?
हेही वाचा…ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….