जळगाव : भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात सातत्याने शाब्दिक हल्लाबोल बघायला मिळतो. यातच गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आजारपणावरून जोरदार टोला हाणला. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना खुलं आवाहन दिलं आहे.
हेही वाचा…“…तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल”, कोणी केली मोठी घोषणा ? राजकीय वर्तुळात चर्चा
श्री खडसे यांना गौण खनिज प्रकरणी १३७ कोटींची नोटीस आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून एअर अॅम्बुलन्सने मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. असा कोणता ह्यदयविकाराचा झटका त्यांना आला ? खोटी सोंगं करायची. उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे. याला काय म्हणावे ? त्यापेक्षा खडसे यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी सरकारच्या योजनांच्या जागर रथाला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी लगावला.
हेही वाचा…सतेज पाटील, मुश्रीफांकडून कारखानदारांवर दबाव, ऊस दरवाढीवरून राजु शेट्टींनी घेतला आंदोलनाचा पवित्रा
गिरीश महाजन यांच्या टिकेला खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्या आजारपणावर शंका उपस्थित केली होती. सहानुभूती मिळविण्यासाठीचा खटाटोप असे त्यांनी म्हटले होते. श्रीमान गिरीश महाजन, नाटक करण्याची मला कधी गरज पडत नाही व तो माझा धंदाही नाही. त्यासंदर्भात आज मी तुम्हाला आवाहन करतो, माझ्या आजारपणाचे सगळे कागदपत्रे तपासा, जर माझे आजारपण खोटे असेल तर मला भर चौकात जोड्याने मारा आणि खरे असेल तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो. असं आवाहनी त्यांनी दिलंय.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन @girishdmahajan यांनी माझ्या आजारपणावर शंका उपस्थित केली होती. सहानुभूती मिळविण्यासाठीचा खटाटोप असे त्यांनी म्हटले होते. श्रीमान गिरीश महाजन, नाटक करण्याची मला कधी गरज पडत नाही व तो माझा धंदाही नाही. त्यासंदर्भात आज मी तुम्हाला आवाहन करतो, माझ्या… pic.twitter.com/I5YyQ6ryVS
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“जितक्या नोंदी सापडतील त्याची श्वेतपत्रिका काढा,” ओबीसी महासंघाचं शिंदे समितीला पत्र
हेही वाचा…सकाळी अपात्र खासदारांच्या यादीतून नाव वगळलं, दुपारी अजित पवारांची भेट, अमोल कोल्हे म्हणाले..,
हेही वाचा…२०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार तयार, माजी केंद्रीय मंत्र्यांला लोकसभेची उमेदवारी जाहीर ?
हेही वाचा…शिरूरचं राजकारण तापलं..! आढळराव पाटील अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनंतर अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला
हेही वाचा…“भुजबळाचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं”,जरांगे पाटलांनी भुजबळांना पुन्हा डिवचलं