बीड : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने भाजपच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महादेव जानकर सध्या संपुर्ण राज्यात पदयात्रा काढत असून पक्षाचा विस्तार वाढावा, यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. यातच त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, थेट शरीरातील अवयवांचे पाठवले रेट कार्ड, किडनी ७५,००० तर लिव्हर ९०,०००…
महादेव जानकर हे पंकजा मुंडे यांना बहिण मानतात. भाऊ-बहिणीचं नातं त्यांचं आता संपुर्ण जगाला माहिती आहे. यातच आता त्यांनी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. पंकजा मुंडेंनी भाजपवरील नाराजी उघडउघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे महादेव जानकरांच्या वक्तव्याला आता बळ मिळालं आहे.
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, भुजबळांच्या बंगल्याची सुरक्षा टाईट
दरम्यान, आम्हाला भाजपमध्ये पक्ष विलीन करा असे म्हटलं होतं. पण आम्ही पक्ष विलीन केला नाही. आम्ही होतो म्हणून भाजपचे सरकार आलंय नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला कोणी ओळखत नाही. भाजप हा छोट्या छोट्या पक्ष्याला टेकू बनवत आणि मोठा होऊ पहात आहे. असाही आरोप त्यांनी केलाय. यातच पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी मला आता जवळच दिसायला लागलंय. असं म्हटलंय. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, असं होत असेल तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल अशी घोषणाही त्यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…सतेज पाटील, मुश्रीफांकडून कारखानदारांवर दबाव, ऊस दरवाढीवरून राजु शेट्टींनी घेतला आंदोलनाचा पवित्रा
हेही वाचा…“३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”, कुणी केली भविष्यवाणी ?
हेही वाचा…प्रिय देवेंद्रजी..,’पनवती’ हा शब्द भाजपवाल्यांना इतका का झोंबला? कुणी डिवचलं?
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंना उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार? नवा आणि आश्वासक चेहऱ्याचा शोध, आज बैठक
हेही वाचा…शरद पवार गटातील ४ खासदारांना निलंबित करा, परंतु अजित पवार गटाने ‘या’ 3 खासदारांना वगळलं, एकच चर्चा