मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राजस्थानमधील प्रचार सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांचा अप्रत्यक्षपणे पनवती असा उल्लेख करत जोरदार टोला हाणला. यावरून भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टिका करण्यात आलीय. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला आता काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी चांगलचं डिवचलं आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांकडून पंढरीत विठूनामाचा गजर, टाळ मृदूंग वाजवत फुगडीही खेळली
प्रिय देवेंद्र फडणवीस, आपलाही आक्रोश मी समजू शकते, पण एक समजून घ्या की, पनवती हे नाव काॅंग्रेस किंवा जननायक राहुल गांधी यांनी दिलेले नाही. राहुल गांधी यांच्या दुष्प्रचारासाठी भाजपने जसे लाखो करोडो रूपये खर्च केले तसा काहीही प्रकार काॅंग्रेसने याबाबतीत केलेला नाही. हे नाव तर जनतेने मोदी यांना दिला आहे. असा जोरदार टोला वर्षा गायकवाड यांनी फडणवीसांना लगावला.
हेही वाचा…“आधी गुन्हा अन् आता निमंत्रण,” लोअर परळ पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंना निमंत्रण
तसेच पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत असताना सभेतील गर्दीतूनच पनवती पनवती असा आवाज येत होता. तो संदर्भ घेऊन राहुल गांधी यांनी कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तीचे नाव न घेता बोलले आहेत. दुसरे काही नाही. दुसरे काही नाही. खरंतर राहुल गांधी, काॅंग्रेस पक्ष किंवा कुणाविरूद्धही अपप्रचार करण्याऐवजी भाजपावाल्यांनी हे आत्मसाद करण्याची गरज आहे. जेव्हा जेव्हा फेकूगिरी, गाजर दाखवणे, जुमलेबाज, पनवती अशा शब्दांचा प्रयोग होतो तेव्हा जनता केवळ एकच व्यक्ती, एकच पक्षावर का बोट ठेवते? असा खोचक सवालही वर्षा गायकवाड यांनी फडणवीसांना लगावला.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व- देशी गोवंश पशु प्रदर्शन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम
दरम्यान, देवेंद्र फडणवीस तुम्ही राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या व्यर्थ विधानावर एवढेच म्हणेन की जग ज्याला पाहिल त्याकडे आपसूक लक्ष जाई, तरी म्हणे आम्ही नाही त्यातले त्याला पाहण्यातले, असू द्या हो. असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
‘पनवती’ हा शब्द भाजपवाल्यांना इतका का झोंबला?
प्रिय @Dev_Fadnavis जी, आपलाही आक्रोश मी समजू शकते. पण एक समजून घ्या की, #पनवती हे नाव @INCIndia किंवा जननायक @RahulGandhi जींनी दिलेले नाही.. राहुल गांधीजींच्या दुष्प्रचारासाठी @BJP4India ने जसे लाखों करोडो रुपये खर्च केले तसा…
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंना उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार? नवा आणि आश्वासक चेहऱ्याचा शोध, आज बैठक
हेही वाचा…शरद पवार गटातील ४ खासदारांना निलंबित करा, परंतु अजित पवार गटाने ‘या’ 3 खासदारांना वगळलं, एकच चर्चा
हेही वाचा…सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, थेट शरीरातील अवयवांचे पाठवले रेट कार्ड, किडनी ७५,००० तर लिव्हर ९०,०००…
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, भुजबळांच्या बंगल्याची सुरक्षा टाईट
हेही वाचा…फडणवीसांसोबत विठ्ठलाची पुजा करण्याचा मान नाशिकच्या ‘या’ दाम्पत्याला, फडणवीसांकडून विठ्ठलाच्या मंदिरासाठी निधीचा पाऊस