पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना पक्ष फुटीनंतर अनेक कार्यकर्त्यांनी साथ सोडल्यानंतर आता पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ठाकरेंनी मोठी सुरूवात केली आहे.
हेही वाचा…“आधी गुन्हा अन् आता निमंत्रण,” लोअर परळ पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंना निमंत्रण
आज दुपारी एक वाजल्यानंतर खोपोलीत उद्धव ठाकरे विधानसभा आणि लोकसभा निहाय बैठक घेणार आहेत. या बैठकीत मावळ लोकसभा निवडणुकीचा तसेच कर्जत विधानसभा निवडणुकीचा आढावा ठाकरेंकडून घेतला जाणार आहे. सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे खासदार तर कर्जत विधानसभा मतदारसंघात महेंद्र थोरवे आमदार असून दोघंही शिंदे गटात आहेत.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व- देशी गोवंश पशु प्रदर्शन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम
मावळ आणि खोपोलीतील दोन्ही लोकप्रतिनिधी शिंदे गटात गेल्याने ठाकरेंकडून नवा आणि आश्वासक चेहरा दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून यातून काही नावं समोर येण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटातील ४ खासदारांना निलंबित करा, परंतु अजित पवार गटाने ‘या’ 3 खासदारांना वगळलं, एकच चर्चा
हेही वाचा…सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, थेट शरीरातील अवयवांचे पाठवले रेट कार्ड, किडनी ७५,००० तर लिव्हर ९०,०००…
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, भुजबळांच्या बंगल्याची सुरक्षा टाईट
हेही वाचा…फडणवीसांसोबत विठ्ठलाची पुजा करण्याचा मान नाशिकच्या ‘या’ दाम्पत्याला, फडणवीसांकडून विठ्ठलाच्या मंदिरासाठी निधीचा पाऊस
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांकडून पंढरीत विठूनामाचा गजर, टाळ मृदूंग वाजवत फुगडीही खेळली