पंढरपूर : कार्तिक एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापुजा सपत्नीक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत महापुजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मानदुमला गावच्या बबन घुगे आणि सौ वत्सला घुगे यांना मिळाला. मराठा समाजाने सुरूवातीला यासाठी विरोध केला होता. परंतु प्रशासन आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने विठ्ठलाची महापुजा अगदी सुरळीतपणे पार पडली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
हेही वाचा…“..त्यामुळे त्याचं मला खूप दु:ख झालं,” ‘त्या’ फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर व संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन सोहळा देखील यावेळी पार पडला. कार्तिकी एकादशीचे औचित्य साधत आज पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंजूर केलेल्या ₹73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील ₹26 कोटींच्या विविध कामांचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन यांचा समावेश आहे. यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री तानाजी सावंत, मंत्री सुरेश खाडे जी, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते.
हेही वाचा…महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून, सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल
दरम्यान, विठ्ठलाचा नामघोष करत आज वारकऱ्यांनी पंढरी दुमदुमून गेली. यासाठी महामंडळाकडून ठाणे जिल्ह्यातून जादा १२३ एसटी बसेसचं नियोजन करण्यात आलं आहे. यातच पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक पंढरपूरला रवाना झाले आहेत. यातच पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांकडून पंढरीत विठूनामाचा गजर, टाळ मृदूंग वाजवत फुगडीही खेळली
हेही वाचा…“आधी गुन्हा अन् आता निमंत्रण,” लोअर परळ पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंना निमंत्रण
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व- देशी गोवंश पशु प्रदर्शन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम
हेही वाचा…“महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर जातोय की काय असं वाटू लागलंय”
हेही वाचा…मोठी बातमी..! बीड जाळपोळ प्रकरणात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई