मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊमधील एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमधून कसिनो खेळत बावनकुळेंनी साडेतीन कोटी रूपये जुगारात उडवल्याचा दावा केला. यावरून भाजप आणि ठाकरे गटात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यातच या प्रकरणावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा…शरद पवार गटातील खासदारांची उपराष्ट्रपतींशी भेट अन् इकडे प्रफुल पटेलांच्या मनात धडकी भरली
चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कुटुंबासह दिवाळी संपल्यानंतर परदेशात गेले होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंचा एका हॉटेलमध्ये असलेला फोटो राऊतांनी ट्विट केला. त्यात चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळत असल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला. यावरून बराच राजकीय द्वंद रंगलं. यातच आता चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रात आले असता त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“..म्हणून मी संत तुकाराम महाराजांबद्दल तसं बोललो,” बागेश्वर बाबांचा पुन्हा माफिनामा
दरम्यान, आम्ही मतदारसंघातून चार चार वेळा निवडून आलो आहोत. ३४ वर्षे काम करून आम्ही आमची प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे एखाद्या फोटोवरून कुणी कुणाची प्रतिमा खराब करू शकत नाही. असा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांचं त्यांना लखलाभ. माझ्या कुटुंबाबरोबर हॉंगकॉंग, मकाऊला गेलो होतो. पण व्यक्तिगत जीवनात आमच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला याच दु:ख वाटलं. असं बावनकुळे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून, सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…उमेदवार ‘रेल्वे इंजिन’चाच असणार, बुलढाणा लोकसभा निवडणुकबाबत मनसेचं ठरलं
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल, युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“तुम्हीच सांगा..,तर काय करायला हवं ?” ऐकलं नाही तर मनसे खळखट्याक करण्याच्या तयारीत
हेही वाचा…“२५ लाख बेरोजगारांचा प्रश्न, परिक्षांचा निकाल कधी ?” विरोधी पक्षांचा सरकारवर जोरदार घणाघात