नवी दिल्ली : सध्या राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला आता शरद पवार गट अजित पवार गटातील एक एक मोहऱ्याला टार्गेट करतांना दिसत आहेत. अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेलांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांची भेट घेतली आहे. त्यामुळे प्रफुल पटेलांच्या मनात आता धडकी भरल्याची माहिती समोर आलीय.
हेही वाचा…मोठी बातमी..! ससूनमधून पळून जाण्यास ललित पाटीलला पोलिसांची मदत, धागेदोरे अजून कुठपर्यंत ?
शरद पवार गटाच्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यासह काही नेत्यांसह काल उपराष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी ४ महिन्यांपूर्वी दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षविरोधी कृती केल्यामुळे प्रफुल पटेल यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात निवेदन उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्याकडे देण्यात आलं.
हेही वाचा…राजस्थानच्या निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री, ‘या’ माजी मंत्र्यांचा करणार प्रचार
दरम्यान, वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांना पत्राच्या माध्यमातून आठवण देखील करून देण्यात आली होती. वंदना चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांची भेट घेतली आहे.
With Hon. Jagdeep Dhankhar Ji – Vice President of India and Chairman of Rajya Sabha. Thank you Sir for giving us the opportunity to spend some valuable time with you.@VPIndia pic.twitter.com/sOJHQTxyq4
— Supriya Sule (@supriya_sule) November 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“..म्हणून मी संत तुकाराम महाराजांबद्दल तसं बोललो,” बागेश्वर बाबांचा पुन्हा माफिनामा
हेही वाचा…“एक फुल अन् दोन हाफ सरकारमुळे राज्याचं मोठं नुकसान,” वडेट्टीवारांचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“तर तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल आणि फुलं आणतो”, जरांगे पाटलांचं अजित पवारांना खास आवाहन
हेही वाचा…शरद पवारांनी उभी केली महिलांची मोठी फौज, राष्ट्रवादीत अनेक महिलांना लागली लॉटरी
हेही वाचा…“चुकीला माफी नाही”, बागेश्वर बाबा संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत दाखल