मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर शरद पवार गटात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यातच महिला प्रदेशाध्यक्ष पदी आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची वर्णी लागली तर जिल्हा तसेच राष्ट्रीय स्तरावर शरद पवारांनी अनेकांची नियुक्ती केली. यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटात अनेक जिल्ह्यात बड्या महिला नेत्यांना मोठी जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा प्रशासनाला अल्टिमेटम, मराठा आंदोलक अन् प्रशासनाची महत्वाची बैठक संपन्न
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजीयाखान, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, सुप्रिया सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी तसेच पक्ष बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी अनेक महिलांना प्रदेश उपाध्यक्ष पदावर संधी दिली आहे.
हेही वाचा…मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
यामध्ये राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षापदी जयमाला गायकवाड, रत्नागिरी प्रदेश उपाध्यक्षा पदी सुजाता तांबे, सिंधुदूर्ग राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षापदी नम्रता कुबल, नांदेड राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षापदी कल्पना डोंगळीकर, नवी मुंबई राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षापदी डॉ. प्राजक्ता मोंडकर तसेच खेड तालुका राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षापदी राजमाला बुट्टेपाटील यांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस पक्षाचं बळ वाढलं, ‘या’ दोन बड्या पक्षांनी काॅंग्रेसला जाहीर केला पाठिंबा
त्याबरोबर पौर्णिमा काटकर यांची मीरा भाईंदरसाठी प्रदेश सरचिटणीस, रत्नागिरी प्रदेश सरचिटणीस म्हणून चित्रा चव्हाण, पुणे प्रदेश सरचिटणीस स्वामी पोकळे यांची निवड केली आहे. तर नवी मुंबई-पनवेल प्रभारी म्हणून भावना घाणेकर यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा म्हणून दिपीका कोतावडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजीयाताई खान माननीय आमदार श्री जयंतराव पाटील साहेब व आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल
पक्ष बळकटीकरणासाठी व… pic.twitter.com/gKkjnNGTxc— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“चुकीला माफी नाही”, बागेश्वर बाबा संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत दाखल
हेही वाचा…मोठी बातमी..! ससूनमधून पळून जाण्यास ललित पाटीलला पोलिसांची मदत, धागेदोरे अजून कुठपर्यंत ?
हेही वाचा…राजस्थानच्या निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री, ‘या’ माजी मंत्र्यांचा करणार प्रचार
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळवा”, एकनाथ खडसेंनी कोणती केली मागणी ?
हेही वाचा…अखेर मराठा आंदोलकांनी नमतं घेतलं, विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कुणाला ?