सोलापूर : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठालाची उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापुजेला मराठा समाजाने विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मराठा आंदोलक आणि प्रशासन यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासनाने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापुजेला संमती दर्शवली आहे.
हेही वाचा…अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून काढली पदयात्रा, अनोख्या पदयात्रेची सर्वत्र चर्चा
आज मराठा आंदोलक आणि जिल्हाधिकारी यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. विठ्ठल रूक्मिणी मातेची शासकीय महापुजेचा मान हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक महापूजा करणार आहेत. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा…कार्तिकी एकादशीच्या पुजेला मराठा समाजाचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ मोठं आवाहन
दरम्यान, मराठा आंदोलकांनी मराठा भवनासाठी पाच एकर जागा, मराठा भवन बांधण्यासाठी पाच कोटी रूपये निधी तात्काळ मंजूर करावा, तसेच मराठा मुला-मुलींसाठी वसतिगगृह आणि सारथी संस्थेचे कार्यालय पंढरपुरमध्ये सुरू करावे, अशा मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. पंढरपुर येथील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला उपमुख्यमंत्र्यांनी येऊन भेट द्यावी अशीही मागणी करण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा प्रशासनाला अल्टिमेटम, मराठा आंदोलक अन् प्रशासनाची महत्वाची बैठक संपन्न
हेही वाचा…मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस पक्षाचं बळ वाढलं, ‘या’ दोन बड्या पक्षांनी काॅंग्रेसला जाहीर केला पाठिंबा
हेही वाचा…जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार दगडफेक
हेही वाचा…शिवसेना अपात्रता प्रकरण..! राहुल नार्वेकरांनी दोन्ही वकिलांना खडसावलं