मुंबई : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठालाची उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापुजेला मराठा समाजाने विरोध केला आहे. यावरून मराठा समाजामध्ये दोन गट पडले असून एक गट अजून या महापुजेच्या विरोधात आहे. यावरून आता मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे. तर कार्तिकी एकदशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापुजा होणार आहे.
हेही वाचा…सन्मान कार्याचा, गौरव व्यक्तींचा,’ लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे पुरस्कार जाहीर
आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढी प्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पुजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…महेश लांडगेंच्या ‘त्या’ हिंदुत्वाच्या भूमिकेचे राहुरीत पडसाद ? अबू आझमींना गावाबाहेरच पोलिसांनी रोखले
दरम्यान, पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सुर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकदशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिषर जयघोषाने दुमदुमुदे, असंही शिंदेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीस अन् सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी,” एकच खळबळ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला, कारागृहात एकच खळबळ
हेही वाचा…“होय, माझ्या मागे मोठी शक्ती आहे”, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणती शक्ती ?
हेही वाचा…नितेश राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं, कोर्टाने बजावले समन्स, संजय राऊतांची मोठी खेळी
हेही वाचा…“भाजपने अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, होय मी मनोरूग्ण,” राऊतांचा फडणवीसांवर पलटवार