पुणे : गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबिवले जात आहेत. यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार विजेत कलाकार महेश काळे यांची शास्त्री, सुगम व भावगीतांची सांयकाळी मैफल ‘सुरसंध्या’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुरांची मेजवानी रसिकप्रेक्षकांनी अनुभवली. तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महान व्यक्तींचा लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे सन्मान करण्यात आला.
हेही वाचा…“महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना मराठा-ओबीसी समाजात आग लावण्याचे सरकारचे षडयंत्र”
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, २०२४ पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमावेळी औंध-बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे येथील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मार्गदर्शक राजेशजी पांडे व पुणे सरचिटणीस पुनीतजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला युवक काॅंग्रेसचा विरोध, तर भीमआर्मी दाखवणार काळे झेंडे
सन्मान करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये. सुधीर जोशी (सामाजिक क्षेत्र), भूषण वासुदेव चौधरी (सामाजिक क्षेत्र), राजश्री विजय टिकेकर (सामाजिक क्षेत्र), हेमंत अंकुश बालवडकर (क्रीडा क्षेत्र), दिनेश चाकणकर (क्रीडाक्षेत्र), संदीप बोरगावकर गुरुजी (धार्मिक क्षेत्र), अरुण कुमार खंडेलवाल (उद्योग क्षेत्र) ह.भ.प. रोहित रामदास बालवडकर (युवा प्रवचनकार), प्राची सिद्दिकी (सामाजिक क्षेत्र), सुमनताई ब्राह्मणकर (सामाजिक क्षेत्र), श्रीकांत गजानन चिटणीस (योग कीर्तनकार), मोहसीन शेख (पत्रकार), डॉक्टर अतुल शिरुडकर (आरोग्य क्षेत्र), गणेश सोपान मुरकुटे (उद्योग क्षेत्र) इत्यादि व्यक्तींचा सन्मान केला गेला.
हेही वाचा…सिगारेटचे चटके देऊन ब’ला’त्का’र करणाऱ्या गावगुंडाला जबरदस्त शिक्षा होणार, महिला आयोग अॅक्शन मोडवर
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राज्याचे ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, कोथरुड विधानसभा उत्तर विभाग अध्यक्ष सचिन पाषाणकर, सचिन दळवी, राहूल कोकाटे, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर,रिना सोमय्या, उत्तम जाधव आदी मान्यवर, संपूर्ण मित्र परिवार, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व तंत्रज्ञ, माझे सर्व मार्गदर्शक, नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, सुर संध्या या कार्यक्रमात महेश काळे यांनी कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय संगीताने केली. या कार्यक्रमात पुर्वाधार्थ त्यांच्या नावाजलेल्या सुमधुर संगीताने केली तर उत्तरार्ध भागात रसिकांना सुचवलेल्या संगतीने मैफल सजवली.
READ ALSO :
हेही वाचा…महेश लांडगेंच्या ‘त्या’ हिंदुत्वाच्या भूमिकेचे राहुरीत पडसाद ? अबू आझमींना गावाबाहेरच पोलिसांनी रोखले
हेही वाचा…अजित पवार गटाचा खोटारडेपणा उघड, शरद पवार गटाने निवडणुक आयोगात दिला मोठा पुरावा
हेही वाचा…भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करणारा ठाकरेंचा शिलेदार अडचणीत, ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी
हेही वाचा…“बावनकुळेंनी जुगारात ३.५ कोटी उडवले, २७ फोटो अन् ६ व्हिडीओ बाहेर काढले तर..” संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? मोठी बातमी आली समोर