मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मकाऊमधील कॅसिनोमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो ट्विट केला. त्यानंतर भाजप आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. यातच कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी उडवले असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.
हेही वाचा…“भाजपच्या बड्या नेत्याने जुगारात ३.५० कोटी उडवले,”? राऊतांनी ट्विट करत ‘या’ नेत्यावर साधला निशाणा
संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो ट्विट केल्यानंतर भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. भाजपने आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट करत राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रूपये उडवले. पैसे डॉलर्समध्ये उडवले. त्याचे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आपल्याकडे आहेत. हे टाकले तर भाजपला दुकान बंद करावं लागेल. असा इशारा त्यानंतर राऊतांनी भाजपला दिलाय.
हेही वाचा…“भुजबळांच्या ‘त्या’ भूमिकेला समर्थन नाही,” वडेट्टीवारांचं वक्तव्य, ओबीसी नेत्यांमध्ये दुफळी ?
दरम्यान, भाजपकडून आदित्य ठाकरे यांचा व्हिस्की पितांनाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यावर विचारले असता. आदित्य ठाकरेंचा आणि मोदींचा ब्रॅंड सेम आहे. मोदी परदेशात जाऊन जे पितात तेच आदित्य ठाकरे पितात, असा खोचक टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? मोठी बातमी आली समोर
हेही वाचा…“महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना मराठा-ओबीसी समाजात आग लावण्याचे सरकारचे षडयंत्र”
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला युवक काॅंग्रेसचा विरोध, तर भीमआर्मी दाखवणार काळे झेंडे
हेही वाचा…सिगारेटचे चटके देऊन ब’ला’त्का’र करणाऱ्या गावगुंडाला जबरदस्त शिक्षा होणार, महिला आयोग अॅक्शन मोडवर
हेही वाचा…“बावनकुळेंचा जुगार खेळतांना फोटो, तर आदित्य ठाकरेंच्या हातात व्हीस्की”, भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटरवार