नवी दिल्ली : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षनाव आणि चिन्हाबाबत काल निवडणुक आयोगात सुनावणी पार पडली. याआधी निवडणुक आयोगात अजित पवार गटाने युक्तिवाद केला होता. काल शरद पवार गटाने अजित पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलेली कागदपत्र, प्रतिज्ञापत्रे ही खोटी बनावट असल्याचा दावा शरद पवार गटाने केला. तसेच यासंदर्भात एक मोठा पुरावा देखील शरद पवार गटाने निवडणुक आयोगात दाखल केला आहे.
हेही वाचा…सिगारेटचे चटके देऊन ब’ला’त्का’र करणाऱ्या गावगुंडाला जबरदस्त शिक्षा होणार, महिला आयोग अॅक्शन मोडवर
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा निवडणूक आयोगात मोठा दावा केला आहे. अजित पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलेला बनावट शपथ पत्राचे एक उदाहरण म्हणून आयोगामध्ये कुवर प्रताप सिंह चौधरी यांना शरद पवार गटाने प्रत्यक्ष हजर केले. त्यांचा पाठिंबा हा शरद पवार यांना आहे. परंतु अजित पवार गटाने त्यांच्या नावाने बनावट शपथपत्र दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा…“बावनकुळेंचा जुगार खेळतांना फोटो, तर आदित्य ठाकरेंच्या हातात व्हीस्की”, भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटरवार
कुवर प्रताप सिंह हे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असून सध्या राष्ट्रवादीमध्ये सचिव पदावर आहेत. परंतु कुवर प्रताप सिंह आपल्या गटात असल्याचा दावा अजित पवार गटाने केला होता. परंतु हा दावा शरद पवार गटाने फेटाळून लावत प्रत्यक्ष त्यांना निवडणुक आयोगासमोर हजर केले असता अजित पवार गटाचा खोटारडेपणा उघड केला आहे. शरद पवार गटात अजून युक्तिवाद बाकी असून पुढची सुनावणी आता २४ नोव्हेंबरला होणार आहे.
हेही वाचा…“भाजपच्या बड्या नेत्याने जुगारात ३.५० कोटी उडवले,”? राऊतांनी ट्विट करत ‘या’ नेत्यावर साधला निशाणा
दरम्यान, अजित पवार गटाची हजारो प्रतिज्ञापत्रे, दस्ताएवज, कागदपत्रे निवडणुक आयोगासमोर ठेवण्यात आली आहेत. खोटी प्रतिज्ञापत्रे ही फसवणुकीच्या तब्बल २४ प्रकरांमध्ये वर्गीकृत करण्यात आली आहेत. मृत व्यक्ती, तालुका व शहरात न राहणारा व्यक्ती, अल्पवयीन मुलगा व मुलगी, झोमॅटोचा कर्मचारी, इन्शुरन्स एंजट यासारख्या विविध पदांचा या खोट्या प्रतिज्ञापत्रांमध्ये समावेश आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करणारा ठाकरेंचा शिलेदार अडचणीत, ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी
हेही वाचा…“बावनकुळेंनी जुगारात ३.५ कोटी उडवले, २७ फोटो अन् ६ व्हिडीओ बाहेर काढले तर..” संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? मोठी बातमी आली समोर
हेही वाचा…“महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना मराठा-ओबीसी समाजात आग लावण्याचे सरकारचे षडयंत्र”
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला युवक काॅंग्रेसचा विरोध, तर भीमआर्मी दाखवणार काळे झेंडे