मुंबई : कॅसिनोतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्विट केल्याने आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन संजय राऊतांवर जोरदार टिका केली. त्यावर आता संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करतांना भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी असं म्हणत डिवचलं आहे.
हेही वाचा…अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? मोठी बातमी आली समोर
देवेंद्र फडणवीस यांनी जी टिका केली ती योग्यच आहे. मी मनोरूग्ण आहे, कारण महाराष्ट्राच्या हिताचा विचार आम्ही करतो. त्यामुळे आम्ही मनोरूग्ण आहोतच. आम्ही मुंबईसह महाराष्ट्र भांडवलदारांच्या घशात घालण्याला विरोध करत आहोत. एका उद्योगपतीला मुंबई विकण्याला विरोध केल्यामुळे आम्ही मनोरूग्ण वाटत असू तर आम्ही आहोत मनोरूग्ण असा पलटवार संजय राऊतांनी केला आहे. तसेच मनोरूग्ण कोण आहे? ते लवकरच समजेल असा इशाराही त्यांनी फडणवीसांना दिला आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना मराठा-ओबीसी समाजात आग लावण्याचे सरकारचे षडयंत्र”
दरम्यान, महाराष्ट्रातील सध्या काय सुरू आहे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्र पेटलेला असताना महाराष्ट्रातील जबाबदार व्यक्ती चीनच्या मकाऊ जुगार खेळत होता. तिथे कुणी पिझ्झा खायला जात नाही. या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठेच म्हटलं नाही की तिथे बसनं गुन्हा नाही. पण हे खोटं बोलतं आहेत. मीही मकाऊला गेलो आहे. पण भाजपने हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती. काल रात्री मला कळालं की, त्यांनी पोकर तिथे घेतलं. ते काय मी समजून घेतलं.? साडे तीन कोटीचे पोकर घेतलं. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. जे छायाचित्र प्रसिद्ध झालं त्यात कुटूंब कुठेही दिसत नाही. असंही राऊतांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…सन्मान कार्याचा, गौरव व्यक्तींचा,’ लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे पुरस्कार जाहीर
हेही वाचा…महेश लांडगेंच्या ‘त्या’ हिंदुत्वाच्या भूमिकेचे राहुरीत पडसाद ? अबू आझमींना गावाबाहेरच पोलिसांनी रोखले
हेही वाचा…अजित पवार गटाचा खोटारडेपणा उघड, शरद पवार गटाने निवडणुक आयोगात दिला मोठा पुरावा
हेही वाचा…भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करणारा ठाकरेंचा शिलेदार अडचणीत, ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी
हेही वाचा…“बावनकुळेंनी जुगारात ३.५ कोटी उडवले, २७ फोटो अन् ६ व्हिडीओ बाहेर काढले तर..” संजय राऊतांनी भाजपला डिवचलं