मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार खडांजगी बघायला मिळत आहे. सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर लगेचच नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांना प्रत्युत्तर देत आहे. अशातच एका वक्तव्यावरून संजय राऊतांनी नितेश राणे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असता त्यांना आज कोर्टाने समन्स बजावलं असून त्यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
हेही वाचा…“बावनकुळेंनी जुगारात ३.५ कोटी उडवले, २७ फोटो अन् ६ व्हिडीओ बाहेर काढले तर..” संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
7 मे रोजी संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. यावरूनच संजय राऊतांनी नितेश राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात आला. त्यानंतर आज माजगाव कोर्टाने नितेश राणे यांना समन्स बजावण्यात आलं आहे. परंतु ते समन्स अजून माझ्यापर्यंत पोहोचलं नसल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं आहे. परंतु आज नितेश राणे यांना कोर्टात हजर राहावं लागणार आहे. नाही तर वकिलांमार्फत नितेश राणे यांना कोर्टात माहिती द्यावी लागणार आहे. नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? मोठी बातमी आली समोर
दरम्यान, खासदार संजय राऊत सातत्याने भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करतांना दिसत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटातील नेते आणि भाजपचे आमदार पलटवार करतांना दिसत आहेत.यातच आता कोर्टाने बजावलेल्या समन्सला नितेश राणे हजर राहणार का ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपने अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, होय मी मनोरूग्ण,” राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
हेही वाचा…सन्मान कार्याचा, गौरव व्यक्तींचा,’ लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे पुरस्कार जाहीर
हेही वाचा…महेश लांडगेंच्या ‘त्या’ हिंदुत्वाच्या भूमिकेचे राहुरीत पडसाद ? अबू आझमींना गावाबाहेरच पोलिसांनी रोखले
हेही वाचा…अजित पवार गटाचा खोटारडेपणा उघड, शरद पवार गटाने निवडणुक आयोगात दिला मोठा पुरावा
हेही वाचा…भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करणारा ठाकरेंचा शिलेदार अडचणीत, ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी